ETV Bharat / bharat

भरधाव चारचाकी उड्डाणपुलावरून कोसळली... दोघांचा मृत्यू, तर 3 अत्यवस्थ - accidents in sonbhadra

उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात एक भरधाव चारचाकी उड्डाणपुलावरून कोसळल्याने भीषण अपघात झाला. चोपान पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी आहेत.

sonbhadra road accident news
भरधाव चारचाकी उड्डाणपुलावरून कोसळली... दोघांचा मृत्यू, तर 3 अत्यवस्थ
author img

By

Published : Nov 14, 2020, 12:59 PM IST

लखनऊ : उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात एक भरधाव चारचाकी उड्डाणपुलावरून कोसळल्याने भीषण अपघात झाला. चोपान पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी आहेत. संबंधित घटना उशीरा रात्री झाल्याचे कळते. दुर्घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस दाखल झाले. यानंतर जखमींना नजीकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काहींची प्रकृती चिंताजन असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी वाराणसीतील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. ऐन दिवाळीच्या दिवशी मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

पार्टी करून माघारी येत असताना काळाचा घाला

जिल्ह्यातील ओबरा परिसरात राहणारे पाच युवक दिवाळीच्या पूर्वसंध्येला डाला या ठिकाणी ढाब्यावर पार्टी करण्यासाठी गेले होते. माघारी येताना भरधाव मोटारीने उड्डाणपुलावरील कठडा तोडला; आणि चारचाकी खाली कोसळली. या दुर्घटनेत लालजी दुबे (वय 25) रविप्रसाद (वय 23) या दोघांचा जागीच मृत्यू झालाय. दोघेही ओबरा येथील रहिवासी आहेत. याव्यतिरिक्त चारचाकीतील अन्य तिघांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. सुजीत कुमार, मनदीप सिंह आणि राजेश चंद्रवंशी अशी गंभीर तरुणांची नावे आहेत. या तिघांना वाराणसीच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.