नवी दिल्ली : सियाचीनमध्ये रविवारी मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झाले. यामध्ये बर्फाखाली दबले गेल्याने लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास हानीफ सब सेक्टरमध्ये ही दुर्घटना घडली.
या जवानांना शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू होते. सायंकाळी सातच्या सुमारास हे दोघे मिळून आले. मात्र, उपचारांदरम्यान ते हुतात्मा झाले. या हिमस्खलनात अडकलेल्या इतर जवानांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली.
सियाचीन हे जगातील सर्वात जास्त उंचीवरील लष्करी तळ म्हणून ओळखलं जातं. समुद्रसपाटीपासून तब्बल २० हजार फूट उंचीवर हे तळ आहे. याठिकाणी हिमस्खलनासारख्या दुर्घटना वारंवार घडत असतात. तसेच, याठिकाणी हिवाळ्यात तापमाना उणे साठ डिग्री सेल्सिअसपर्यंत जाते. या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही जवान याठिकाणी कडा पहारा देत असतात.
हेही वाचा : राज्यातील कोरोनाच्या प्रसारासाठी निवडणूक आयोग जबाबदार; मद्रास उच्च न्यायालयाचे ताशेरे