ETV Bharat / bharat

Twin Marriage : काय सांगताय काय!..जुळ्या बहिणींनी केले जुळ्या भावांशी लग्न! - जुळ्या भावांचे लग्न

देव स्वर्गातच लग्नाच्या गाठी बांधतो असे म्हटले जाते. अशीच एक घटना छिंदवाडा येथे पाहायला मिळाली आहे. येथे दोन जुळ्या बहिणींनी दोन जुळ्या भावांशी लग्न केले. या लग्नाची परिसरात जोरदार चर्चा आहे.

Twin Marriage
जुळ्यांचे लग्न
author img

By

Published : Jun 24, 2023, 9:38 PM IST

पहा व्हिडिओ

छिंदवाडा (मध्य प्रदेश) : जन्मापासून त्या दोघी एकत्र वाढल्या. आता लग्नानंतर देखील एकत्रच नांदतील! एकत्र वाढलेल्या मुली एकमेकांपासून वेगळ्या होतील, याची चिंता आई-वडील आणि कुटुंबीयांना सतावत होती. पण म्हणतात ना की, लग्नाची गाठ स्वर्गातच बांधली जाते. अगदी तसाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये घडला आहे. येथे दोन जुळ्या भावांचे नाते जुळ्या बहिणींशी जोडले गेले आहे. छिंदवाडा येथील धिमरी परिसरात जुळ्या बहिणींच्या लग्नाची मिरवणूक घेऊन जुळे भाऊ आले तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे होते. जुळ्या वधू-वरांनी मिळून वरमाला आणि सात फेऱ्यांसह लग्नाचे सर्व विधी पूर्ण केले.

दोन्ही जुळ्यांमध्ये फक्त 5 मिनिटांचा फरक : या लग्नाबद्दल नातेवाइकांसह परिसरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. जुळ्या जोडप्यांचे लग्न पाहण्यासाठी दुरुन लोक पोहोचले होते. लता आणि लक्ष्मी या जुळ्या बहिणींचा विवाह नागपूर येथील अमन आणि ऋषभ यांच्याशी झाला. नागपूरचे जुळे वर छिंदवाड्यात लग्नाची मिरवणूक घेऊन पोहोचले. मिरवणूक पोहोचल्यावर लताने अमनला आणि लक्ष्मीने ऋषभला हार घातला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, दोन बहिणींमध्ये फक्त 5 मिनिटांचा फरक आहे. तर दोन भावांमध्ये देखील वयाचा तेवढाच फरक आहे. तसेच दोन्ही जुळ्यांच्या सवयी आणि दिसणे देखील सारखेच आहे.

'असा विवाह प्रथमच पाहिला' : आत्तापर्यंत सुमारे एक हजार विवाह संपन्न करणार्‍या पंडित प्रदीप द्विवेदी यांनी सांगितले की, अशा लग्नात ते स्वत: प्रथमच मंत्रांचे पठण करत आहेत, ज्यात वधू आणि वर दोघेही जुळे आहेत. पंडितजींनी सांगितले की, देवाने यांची गाठ बांधली असावी, कारण जुळ्या बहिणी आणि जुळ्या भावांचे नाते क्वचितच पाहायला मिळते. जुळ्या बहिणींचा धाकटा भाऊ सूरज कहार याने सांगितले की, दोन्ही बहिणी जन्मापासून कधीही विभक्त झाल्या नाहीत. आता लग्नानंतरही त्या एकाच घरात जाणार आहेत.

हे ही वाचा :

  1. Rajasthan Mass Marriage : 2222 हिंदूृ-मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक विवाह! सर्व धर्म समानतेची दिसली झलक
  2. Disabled Couples Marriage : पुण्यात 12 दिव्यांग जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी ; थाटामाटात झाले कन्यादान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.