ETV Bharat / bharat

हाजिर हो! पोलिसांच्या प्रश्नांना उत्तर देणार ट्विटर इंडियाचे MD मनीष माहेश्वरी - गाझियाबाद व्हायरल व्हिडिओ

ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी लोणी पोलीस ठाण्यात हजेरी लावणार आहेत. गाझियाबाद पोलिसांनी ट्विटर इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांना जातीय अशांतता पसरवल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठविली होती.

मनीष माहेश्वरी
मनीष माहेश्वरी
author img

By

Published : Jun 24, 2021, 12:00 PM IST

गाझियाबाद - उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील लोणीतील वयोवृद्धाला मारहाण झालेल्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी अडचणीत आले आहेत. आज मनीष माहेश्वरी लोणी पोलीस ठाण्यात हजेरी लावणार असून त्यांना पोलिसांच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागणार आहेत. मनीष माहेश्वरी चौकशीसाठी उपस्थित राहतील, अशी ट्विटरच्या वकिलांनी माहिती दिली.

गाझियाबाद पोलिसांनी ट्विटर इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांना जातीय अशांतता पसरवल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठविली होती. एका आठवड्याच्या आत निवेदन नोंदवण्यासाठी त्यांना लोणी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. ट्विटर इंडियाविरोधात लोणी पोलीस ठाण्यात अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हटलं होते नोटीसीमध्ये?

इंडियाचे एमडी म्हणून तुम्ही कंपनीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे भारतीय कायदा तुम्हाला बंधनकारक असल्याने तपासात सहकार्य करण्याची गरज आहे. भारतातील स्थितीप्रमाणे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ट्विट काढून टाकण्याचे अधिकार आहेत. द्वेष पसरविल्या जाणाऱ्या ट्विटमुळे समाजात तणावाची स्थिती निर्माण झाल्याचेही पोलिसांनी नोटीसमध्ये म्हटले आहे. तसेच देशातील दोन गटांमध्ये शत्रुत्वाची भावना आणि सामाजिक एकतेला धोका निर्माण झाल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले.

काय प्रकरण?

गाझीयाबादमधील व्हायरल व्हिडिओत काही तरुण वृद्ध मुस्लिम व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. 'जय श्रीराम' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा देण्याची बळजबरी हल्लेखोरांनी आपल्यावर केली. मोबाइल काढून घेतला आणि चाकूने आपली दाढी कापली, असे पीडित व्यक्ति अब्दुल समद सैफी यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ति अब्दुल समद सैफी हे बुलंदशहरातील रहिवासी आहेत. गेल्या 5 जूनला ते लोनी बॉर्डरच्या बेहटा येथे पोहचले. अब्दुल समद तेथून एका अन्य व्यक्तिसोबत आरोपी प्रवेश गुज्जरच्या घर बंथला गेले होते. पीडित अब्दुल समद ताबीज बनवण्याचे काम करतात. ताबिजचा प्रभाव उलटा झाल्यानंतर आरोपींनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. तर पीडित व्यक्तीने आपल्या धर्मामुळेच लक्ष्य केल्याचा आरोप केला. तर हा व्हिडिओ व्हायरल होण्यापासून न रोखल्याप्रकरणी ट्विटरवर पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.