ETV Bharat / bharat

TS Singh Deo : निवडणुकीपूर्वी छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा मोठा निर्णय, टीएस सिंहदेव यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती - छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली. या बैठकीत छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टीएस सिंहदेव यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

TS Singh Deo
टीएस सिंहदेव
author img

By

Published : Jun 28, 2023, 10:51 PM IST

रायपूर : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. टीएस सिंहदेव यांच्याकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, 'काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री म्हणून टीएस सिंहदेव यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. टीएस सिंहदेव हे काँग्रेसचे निष्ठावान नेते आणि कार्यक्षम प्रशासक आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या सेवेचा राज्याला मोठा फायदा होणार आहे'.

छत्तीसगडमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका : छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल टीएस सिंहदेव यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, 'आम्ही यासाठी तयार आहोत. महाराज साहेबांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा'. छत्तीसगडमध्ये या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने विधानसभेच्या 90 पैकी 68 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपची 15 जागांवर घसरगुंडी झाली होती. विजयानंतर काँग्रेसने भूपेश बघेल यांना मुख्यमंत्री केले. मात्र, तेव्हापासूनच भूपेश बघेल आणि टीएस सिंग देव यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी काँग्रेसने टीएस सिंहदेव यांना उपमुख्यमंत्री बनवून मोठी खेळी केली आहे.

टीएस सिंहदेव कोण आहेत? : त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव म्हणजेच टीएस सिंह देव हे सुरगुजा राजघराण्यातील आहेत. ते या राजघराण्याचे 118वे राजे आहेत. लोक त्यांना फक्त टीएस बाबा म्हणून संबोधतात. सुरगुजा राजघराण्यातील पिढ्या काँग्रेसशी संबंधित आहेत. 1952 मध्ये प्रयागराज येथे जन्मलेल्या टीएस देव यांनी भोपाळच्या हमीदिया कॉलेजमधून एमए इतिहासाचे शिक्षण घेतले. परंतु त्यांनी छत्तीसगडमधून राजकारणाला सुरुवात केली. 1983 मध्ये त्यांची अंबिकापूर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि येथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. ते सध्या राज्याचे आरोग्यमंत्री आहेत.

सिंहदेव तीनवेळा आमदार : टीएस देव हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ते अंबिकापूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा (2008, 2013, 2018) आमदार आहेत. छत्तीसगड सरकारमध्ये ते क्रमांक दोनवर आहेत. 2013 मध्ये त्यांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बनवण्यात आले. त्यानंतर जानेवारी 2014 मध्ये त्यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. ते 2018 च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष होते.

हेही वाचा :

  1. Chandrashekhar Azad : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला, गोळी कमरेला स्पर्श करून गेली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.