ETV Bharat / bharat

Tripura Assembly Election 2023 : त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान; भाजप, काँग्रेस-सीपीआयएम आणि टिपरा मोथा अशी तिरंगी लढत

author img

By

Published : Feb 16, 2023, 7:17 AM IST

त्रिपुरा विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडत आहे. 60 विधानसभा जागांवर 259 उमेदवारांच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. भाजप, काँग्रेस-सीपीआयएम आणि टिपरा मोथा अशी तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. मतदानांसाठी संपूर्ण प्रशासन सज्ज झाले आहे.

Tripura Assembly Election 2023
त्रिपुरा विधानसभा निवडणूकीसाठी मतदान

आगरतळा (त्रिपुरा) : कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि सीपीआयएमने भाजपचा पराभव करण्यासाठी निवडणुकी आधी युती केल्याने तिरंगी लढत होणार आहे. तर आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप स्वदेशी पीपल्स फ्रंट ऑफ इंडियाशी आघाडी करून निवडणूक लढवत आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसनेही उमेदवार उभे केले आहेत. अनेक जागांवर ते निवडणूक लढवत आहेत.

त्रिपुरा विधानसभा निवडणूक : भाजप ५५ जागांवर तर त्याचा मित्रपक्ष आयपीएफटी सहा जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र दोन्ही मित्रपक्षांनी गोमती जिल्ह्यातील अँपीनगर मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. डावे अनुक्रमे ४७ आणि काँग्रेस १३ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. एकूण ४७ जागांपैकी सीपीएम ४३ तर फॉरवर्ड ब्लॉक, सीपीआय आणि आरएसपी प्रत्येकी एक जागा लढवणार आहे. सीमावर्ती राज्यातील 60 सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत 28 लाखांहून अधिक मतदार मतदान करण्यास पात्र आहेत.2023 मध्ये निवडणूक होणारे त्रिपुरा हे पहिले राज्य आहे. नागालँड आणि मेघालय विधानसभेसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्रिपुरामध्ये 20 महिलांसह एकूण 259 उमेदवार रिंगणात आहेत. 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

भाजपकडून 12 महिला उमेदवार : भाजपने 12 महिला उमेदवार उभे केले आहेत. 2018 पूर्वी त्रिपुरामध्ये कधीही एकही जागा न जिंकलेल्या भाजपने गेल्या निवडणुकीत आयपीएफटीशी युती करून सत्तेत प्रवेश केला. 2018 च्या निवडणुकीत भाजपने विधानसभेत 36 जागा जिंकल्या, 43.59 टक्के मते मिळवली. सीपीआयने 42.22 टक्के मतांसह 16 जागा जिंकल्या. आयपीएफटीने आठ जागा जिंकल्या असून काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. भाजप आपली कामगिरी सुधारेल असा विश्वास व्यक्त करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाचे प्रमुख जेपी नड्डा यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी राज्यात प्रचार केला. राष्ट्रीय नेत्यांव्यतिरिक्त, स्टार प्रचारक, आसाम आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, हिमंता बिस्वा सरमा आणि योगी आदियानाथ यांनीही त्रिपुरामध्ये प्रचार केला.

भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न : दुसरीकडे, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते वृंदा करात, प्रकाश करात, मोहम्मद सलीम आणि माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी त्रिपुरामध्ये पक्षाचा प्रचार केला. काँग्रेस प्रचारकांमध्ये पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी, दीपा दासमुन्शी आणि अजॉय कुमार यांचा समावेश होता. मात्र, राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा यांनी राज्यात प्रचार केला नाही. 1988 ते 1993 या काळात काँग्रेस सत्तेत होती. परंतु आता भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याच्या उद्देशाने दोन्ही पक्षांनी हातमिळवणी केली आहे.

मुख्यमंत्री बोरोडोवली शहरातून निवडणूक लढवणार : मुख्यमंत्री माणिक साहा बोरोडोवली शहरातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने आशिषकुमार साहा यांना उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा चारिलम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्रिपुरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्जी बनमलीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. बिप्लब देब यांनी यापूर्वी या जागेचे प्रतिनिधित्व केले होते. माकपचे प्रदेश सरचिटणीस जितेंद्र चौधरी हे सबरूम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. राज्यात 28,14,584 मतदार असून त्यात 14,15,233 पुरुष, 13,99,289 महिला मतदार आहेत. ते 3,337 मतदान केंद्रांवर मतदान करतील. यात 18-19 वयोगटातील 94,815 आणि 22-29 वयोगटातील 6,21,505 मतदार आहेत. सर्वाधिक 40-59 वयोगटातील मतदारांची संख्या 9,81,089 आहे.

हेही वाचा : CM Yogi Adityanath On Hindu Rashtra : भारत हिंदूराष्ट्र होते, आहे आणि हिंदू राष्ट्रच राहील - योगी आदित्यनाथ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.