रायपूर : छत्तीसगडच्या कांकेर भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यामध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, एसएसबीचा एक जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस अधीक्षक गोरखनाथ बघेल यांनी याबाबत माहिती दिली. रावघाट पोलीस ठाण्याच्या परिसरातील कोसरोंडामध्ये ही चकमक झाली. यामध्ये जखमी झालेल्या एसएसबी जवानाच्या पायाला गोळी लागल्याचे समजत आहे.

शोधमोहीम सुरू..
या चकमकीनंतर परिसरातून काही शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
यापूर्वी नक्षलवाद्यांनी केला होता हल्ला..
यापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे ट्रॅकला सुरक्षा देणाऱ्या जवानांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. तसेच, कोसरोंडा येथील एसएसबीच्या कॅम्पवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता.
मुख्यमंत्र्यांनी मागितली होती अतिरिक्त तुकडी..
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी छत्तीसगडमधील नक्षलवादाला आळा घालण्यासाठी केंद्राकडून सात अतिरिक्त सीआरपीएफ पथकांची मागणी केली होती. यावर आता केंद्राकडून पाच सीआरपीएफ पथकांची परवानगी देण्यात आली आहे. बस्तर भागामध्ये या पाचपैकी चार पथकांची तैनाती करण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत.
हेही वाचा : मुलाने पळून केलं लग्न, आईला निर्वस्त्र करून मुलीच्या नातेवाईकांकडून मारहाण