ETV Bharat / bharat

कानपूर हिंसा प्रकरण : मुख्य आरोपीशी संबंधित खात्यांमधून 50 कोटींचा व्यवहार, खर्चाचा तपास सुरू

परेड स्क्वेअर येथे झालेल्या हिंसाचाराचा ( Kanpur violence case ) तपास करणाऱ्या एटीएसच्या अधिकाऱ्यांना या घटनेतील मुख्य आरोपी हयात जफर हाश्मीशी ( Mastermind hayat jafar hashmi ) संबंधित खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे ( crore rupees in accounts related to Hayat Hashmi ) व्यवहार झाल्याचे आढळून आले.

Hayat Hashmi Kanpur violence case
कानपूर हिंसा मुख्य आरोपी बँक खाते
author img

By

Published : Jun 9, 2022, 9:44 AM IST

कानपूर (उ.प्र) - परेड स्क्वेअर येथे झालेल्या हिंसाचाराचा ( Kanpur violence case ) तपास करणाऱ्या एटीएसच्या अधिकाऱ्यांना या घटनेतील मुख्य आरोपी हयात जफर हाश्मीशी ( Mastermind hayat jafar hashmi ) संबंधित खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे ( crore rupees in accounts related to Hayat Hashmi ) व्यवहार झाल्याचे आढळून आले. गेल्या तीन वर्षांत चार वेगवेगळ्या खात्यांमधून सुमारे ५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा दावा स्थानिक पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, याप्रकरणी कोणीही अधिकारी उघडपणे बोलायला तयार नाही.

हेही वाचा - Kerala : मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर स्वप्ना सुरेश ठाम

हयात जफर हाश्मीने आपल्या संस्थेच्या नावाने सर्व खाती उघडली होती. यामध्ये पोलीस आणि एटीएसच्या पथकाला बाबुपुरवा येथील एका खासगी बँकेत एक, कर्नलगंज आणि बेकनगंज येथे प्रत्येकी एक खाते आणि पंजाब नॅशनल बँकेत एक खाते उघडल्याचे आढळले. खात्यात एवढी मोठी रक्कम आली कुठून, कुठे खर्च झाली, याचा तपास सुरू आहे. पोलीस आयुक्त विजय सिंह मीना यांनी सांगितले की, एटीएस आणि स्थानिक पोलीस अधिकारी हयात जफर हाश्मीचा मोबाइल, बँक खाते आणि इतर अनेक क्रियाकलापांची चौकशी करत आहेत. प्रत्येक मुद्दा गांभीर्याने घेतला जात आहे.

परेड चौकाच्या आजूबाजूला ज्या ठिकाणी उपद्रव झाला होता तेथे आता पीएसीच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहे. त्याचवेळी, शांतता कायम राखण्यासाठी आता शुक्रवारच्या नमाजच्या दिवशी फौजफाटा तैनात केला जाईल. तसेच, पोलीस सर्वांना सहकार्य करतील. कोणत्याही प्रकारचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त विजयसिंह मीना यांनी दिली.

हेही वाचा - Ganga Dussehra 2022 : आज गंगा दसर्‍याच्या दिवशी बनणार चार फलदायी योग, जाणून घ्या राशीनुसार दानाचे महत्त्व

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.