ETV Bharat / bharat

Plane Crash in Balaghat : बालाघाटमध्ये महाराष्ट्रातून गेलेले विमान कोसळले; दोन पायलट ठार - विमान कोसळले बालाघाट

बालाघाट येथे प्रशिक्षणार्थी विमान अपघातात वैमानिक आणि सहवैमानिकाचा मृत्यू झाला आहे. या विमानाने महाराष्ट्रातील गोंदियाच्या बिरसी हवाई पट्टीवरून उड्डाण घेतल्याचे सांगितले जात आहे. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Plane Crash in Balaghat
विमान अपघात
author img

By

Published : Mar 18, 2023, 6:55 PM IST

Updated : Mar 18, 2023, 9:06 PM IST

बालाघाटमध्ये विमान कोसळले

बालाघाट (मध्य प्रदेश) : जिल्ह्यातून मोठी घटना समोर आली आहे. बालाघाट जिल्ह्यातील लांजी पोलीस ठाण्यांतर्गत लोडगी चौकी परिसरात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले आहे. या अपघातात विमानाचा वैमानिक आणि सहवैमानिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लांजी येथील भक्कू टोला या नक्षलग्रस्त गावात ही घटना घडली.

महाराष्ट्रातून घेतले होते उडाण : बालाघाटमध्ये कोसळलेल्या प्रशिक्षणार्थी विमानाने महाराष्ट्रातील बिरसी हवाई पट्टीवरून दुपारी 2 वाजता उड्डाण केले होते. त्यानंतर काही वेळातच विमान कोसळले. प्राथमिक माहितीनुसार, बालाघाटमधील लांजी आणि किरणापूर पोलीस स्टेशन हद्दीतील भक्कुटोलाच्या टेकडीवर हे विमान कोसळले आहे. या अपघातात महिला प्रशिक्षणार्थी वैमानिक रुक्षंका आणि प्रशिक्षक मोहित यांचा मृत्यू झाला आहे.

दोन पायलट ठार : गोंदियाचे एटीसी एजीएम कमलेश मेश्राम यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, बालाघाट जिल्ह्यातील लांजी आणि किरणापूर दरम्यानच्या भक्कुटोला-कोसमरा टेकडीवर हा अपघात झाला. एटीसी गोंदियाचे एजीएम कमलेश मेश्राम यांनी सांगितले की, प्रशिक्षणार्थी पायलट रुक्षंका वरसुका आणि प्रशिक्षक मोहित यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

प्रशिक्षणार्थी विमान कोसळले : बालाघाटचे पोलिस अधिक्षक समीर सौरभ यांनी देखील या विमान दुर्घटनेबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, हे विमान प्रशिक्षणार्थी विमान होते. या विमानाने महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील बिरसी हवाई पट्टीवरून उड्डाण केले होते. घटनास्थळ बालाघाट जिल्हा मुख्यालयापासून 40 किमी अंतरावर आहे.

उड्डाणाच्या 15 मिनिटांनंतर अपघात : बालाघाटमध्ये विमान कोसळल्याची दुर्घटना आज दुपारी 3.20 च्या सुमारास घडली. अपघाताच्या 15 मिनिटांपूर्वी विमानाने बिरसी हवाई पट्टीवरून उड्डाण केले होते. सध्या बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, या विमान अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी : बालाघाट जिल्ह्यात ही विमान दुर्घटना जिथे घडली तिथे दोन्ही बाजूला डोंगर आहेत. विमानाचे अवशेष डोंगराच्या मध्यभागी 100 फूट खोल दरीत सापडले आहेत. घनदाट जंगल आणि डोंगराळ भागामुळे बचाव पथक आणि अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत आहेत.

हेही वाचा : Amritpal Singh Filmy Style Arrest : 100 पोलिसांच्या गाड्या, 2 तास पाठलाग; फिल्मी स्टाईलने अमृतपाल सिंग सापडला कचाट्यात

Last Updated : Mar 18, 2023, 9:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.