कर्तारपूर साहिब (पंजाब) : पंजाबमधील कर्तारपूर साहिब येथे रेल्वे अपघातात तीन प्रवासी मजुरांच्या मुलांचा मृत्यू झाला. यातील दोन मुलांचा मृत्यू जागीच झाला असून एकाचा मृत्यू रुग्णालयात नेत असताना झाला. चौथ्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एएसआय जगजित सिंह यांनी सांगितले की, ही मुले झाडांवरची बोरी खायला आली होती. मात्र ट्रेन जवळ येत आहे हे त्यांना कळले नाही. त्यामुळे हा अपघात झाला. आज सकाळी 11:20 वाजता ही मुले ट्रॅकवरून चालत असताना सहारनपूरहून उनाकडे जाणाऱ्या रेल्वेने यांना धडक दिली. घटनास्थळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने पोहोचले असून असून पुढील कारवाई सुरू आहे.