ETV Bharat / bharat

केंद्रीय ट्रेड युनियनकडून आजपासून 2 दिवसीय भारत बंदचे आवाहन, बँकिंग सेवा प्रभावित होण्याची शक्यता - भारत बंद ट्रेड युनियन आवाहन

केंद्रीय कामगार संघटनांनी (A joint forum of central trade unions) सरकारच्या कामगार, शेतकरी आणि लोकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आजपासून (protest against government policies) 28 आणि 29 मार्च हे दोन दिवस (trade unions call two day bharat bandh) देशव्यापी संपाचे आवाहन केले आहे.

bharat bandh trade union appeal
भारत बंद ट्रेड युनियन आवाहन
author img

By

Published : Mar 28, 2022, 10:08 AM IST

नवी दिल्ली - केंद्रीय कामगार संघटनांनी (A joint forum of central trade unions) सरकारच्या कामगार, शेतकरी आणि लोकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आजपासून (protest against government policies) 28 आणि 29 मार्च हे दोन दिवस (trade unions call two day bharat bandh) देशव्यापी संपाचे आवाहन केले आहे. ट्रेड युनियनच्या संपामुळे बँकिंग सेवा प्रभावित होऊ शकते.

हेही वाचा - कॉर्नर शॉट वेपन सिस्टीम : डीआरडीओने बनवले खास हत्यार, लपलेल्या हल्लेखोरांचा क्षणार्धात होणार खात्मा

कामगार संघटनांनी सांगितल्यानुसार, कामगारविरोधी, शेतकरीविरोधी, जनताविरोधी आणि देशविरोधी धोरणांच्या विरोधात 28 आणि 29 मार्च 2022 ला दोन दिवसीय संपाबाबत विविध राज्य आणि क्षेत्रांमध्ये तयारीच्या बाबतीत 22 मार्च 2022 रोजी केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाची दिल्ली येथे बैठक झाली. एस्माच्या (अनुक्रमे हरियाणा आणि चंदीगड) धोक्यानंतरही रस्ते, वाहतूक आणि वीज क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

बँकिंग सेवा प्रभावित होऊ शकते : ट्रेड युनियनच्या आजपासून (२८ आणि २९ मार्च) दोन दिवसीय देशव्यापी संपामुळे बँकांच्या कामकाजावरही काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. बँक कर्मचारी संघटनांच्या एका वर्गाने सोमवारी आणि मंगळवारी होणाऱ्या या संपाला पाठिंबा दिला आहे. सरकारची जनविरोधी आर्थिक धोरणे आणि कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ केंद्रीय ट्रेड युनियनचे सयुक्त मंच आणि विविध प्रदेशांतील स्वतंत्र कामगार संघटनांनी दोन दिवसीय संपाचे आवाहन केले आहे.

काय आहेत मागण्या : त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कामगार संहिता रद्द करणे, कोणत्याही प्रकारचे खासगीकरण थांबवणे, राष्ट्रीय मौद्रीकरण पाइपलाइन (एनएमपी) समाप्त करणे, मनरेगा अंतर्गत मजुरीसाठी वाटप वाढवणे आणि कंत्राटी कामगारांना नियमित करणे यांचा समावेश आहे.

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (एआईबीईए) सांगितले की, आम्ही या संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकिंग क्षेत्राच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही या संपात सहभागी होत आहोत. बँक युनियनची अशी मागणी आहे की, सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण थांबवून त्यांना बळकट करावे, असे एआईबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी सांगितले. याशिवाय बुडीत कर्जाची वसुली लवकर करावी, अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर, बँक ठेवींवरील व्याज वाढवा, सेवा शुल्क कमी करा आणि जुनी पेन्शन योजना पूर्ववत करा.

एसबीआयने सांगितले की, त्यांनी त्यांच्या सर्व शाखा आणि कार्यालयांचे कामकाज सामान्यपणे चालावे यासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) ने म्हटले आहे की एआईबीईए (AIBEA), बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA) यांनी 28 आणि 29 मार्च रोजी संपाच्या नोटीस दिल्या आहेत. बेंगळुरू मुख्यालय असलेल्या कॅनरा बँकेनेही संपामुळे सामान्य बँकिंग कामकाजावर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली आहे.

संपाबाबत कोळसा, पोलाद, तेल, दूरसंचार, टपाल, आयकर, तांबे, बँका, विमा आदी क्षेत्रांना नोटीस देण्यात आल्या आहेत. कामगार संघटनांनी सांगितल्यानुसार, नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या निवडणुकांच्या निकालाने उत्साहित झालेल्या केंद्रातील भाजप सरकारने कष्टकरी जनतेच्या हिताच्या विरोधात धोरणे जोमाने राबवण्यास सुरुवात केली आहे, याची दखल या बैठकीत घेण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी ठेवीवरील व्याजदर ८.५ टक्क्यांवरून ८.१ टक्के करण्यात आले आहे. यासोबतच पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी आदींच्या किमतीत अचानक वाढ करण्यात आली आहे. या प्रकाराची बैठकीत दखल घेण्यात आली आहे.

बैठकीत संयुक्त किसान मोर्चाच्या घोषणेचे स्वागत करण्यात आले आहे. त्यांनी 28-29 मार्च रोजी 'गाव बंद'ची हाक दिली आहे. बैठकीत विविध राज्यस्तरीय कामगार संघटनांना केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरोधात संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - Petrol, Diesel Prices : पेट्रोल आणि डिझेलची दर वाढ सुरुच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.