उत्तराखंड : पर्यटकांनी भरलेली कार ढेला नदीत कोसळली, 9 जणांचा मृत्यू, 6 मृतदेह सापडले - पर्यटकांनी भरलेली कार वाहून गेली
नैनितालच्या रामनगरमध्ये झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. पर्यटकांनी भरलेली एर्टिगा कार ढेला नदीत ( Dhela river of Ramnagar ) वाहून गेल्याचे सांगण्यात येत ( Tourist car washed away in Dhela river ) आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका मुलीला सुखरूप वाचवण्यात यश आले आहे.
रामनगर ( उत्तराखंड ) : नैनितालच्या रामनगरमध्ये झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. पर्यटकांनी भरलेली एर्टिगा कार ढेला नदीत ( Dhela river of Ramnagar ) वाहून गेल्याचे सांगण्यात येत ( Tourist car washed away in Dhela river ) आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका मुलीला सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये एकूण 10 जण होते, त्यापैकी एका मुलीला वाचविण्यात आले आहे.
तीन मृतदेहांचा शोध सुरु : घटनास्थळी जिल्हा प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत असून सर्व मृतदेह घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचवेळी कारमधून आणखी तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, कारमध्ये स्थानिक लोक तसेच पंजाबमधील काही पर्यटक होते.
दहा जण असल्याची माहिती : प्राथमिक माहितीनुसार, ही कार एर्टिगा होती आणि या कारमध्ये एकूण 10 जण होते असे सांगण्यात येत आहे. ही घटना पहाटे ५ वाजताची आहे. प्रशासनाने तत्परता दाखवत स्थानिक लोकांनी एका मुलीला सुखरूप वाचवले आहे. घटनास्थळी जिल्हा प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे.
हेही वाचा : Uniform Civil Code: देशाला समान नागरी कायद्याची गरज.. लवकरच केंद्र सरकार आणणार कायदा : रामदास आठवले