अहमदनगर - आईच्या दशक्रिया विधीच्या आदल्याच दिवशी तिने या जगाचा निरोप घेतला. आता आई आणि मुलीचा एकत्रित दशक्रिया विधी आज करण्याची वेळ अहमदनगर जिल्हातील अकोले येथील शिंदे कुटुबीयांवर आली आहे. सुकृता हिने पत्रकारीतेमध्ये पदविका प्राप्त केली होती. अकोले तालुक्यातील ही पहिली महिला पत्रकार उमलन्या आधीच कोमेजून गेलीये. सविस्तर वाचा..
नाशिक - शहरातील द्वारका सर्कल येथे युटर्न घेण्याच्या नादात भारत पेट्रोलियमचा टँकर उलटला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सविस्तर वाचा..
रत्नागिरी - दापोलीत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात अनेक गावे जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. हर्णैत झालेल्या ढगफुटीने गावातील संपूर्ण रस्ते जलमय झाले होते. तसेच नाथनगर येथील अनेक घरांमध्ये पावसाच्या पुराचे पाणी घुसल्याने लोकांची धावपळ उडाली. हर्णै परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे पावसाचे पाणी सर्व नाथद्वारनगर, मेमन कॉलनी आणि हर्णै परिसरामध्ये घुसून हर्णै येथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही पावसाचा जोर कायम रहिल्यास पुन्हा जनजीवन विस्कळीत होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सविस्तर वाचा..
पालघर - वाणगाव जवळील देहणे येथील फटाके कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट एवढा होता की, या स्फोटाच्या आवाजाने 15 ते 20 किलोमीटरचा परिसर हादरला आहे. फटाक्यात वापरल्या जाणाऱ्या दारूचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक कामगार हे जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. सविस्तर वाचा..
कोल्हापूर- मराठा समाजाच्या मागणीसंदर्भात आज मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा होणार आहे. ही चर्चा सकारात्मक होईल अशी अपेक्षा आहे. मात्र ही चर्चा सकारात्मक नाही झाली तर काय होईल? ते मला सांगायची गरज नाही. नकारात्मक चर्चा झाली तर आंदोलनावर ठाम आहोत. असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिला. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सायंकाळी पाच वाजता बैठक होणार आहे. या बैठकीसाठी आज खासदार संभाजीराजे छत्रपती मुंबईकडे रवाना झाले. सविस्तर वाचा..
नागपूर - शासकीय विभागात अभियंता असलेल्या एका इसमाच्या पत्नीने चक्क नागपूरात डॅाक्टर दाम्पत्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. एक कोटी रुपये न दिल्यास मुलाच्या अपहरणाची धमकी त्या महिलेने दिली होती. या घटनेची तक्रार दाखल होताच नागपूर शहरातील बेलतरोडी पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे. शीतल इटनकर असे त्या महिलेचे नाव असून ती देखील फॅशन डिझायनर आहे. घर खर्च भागात नसल्याने तिने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे, महत्वाचे म्हणजे तिच्या नवऱ्याचा पगार दीड लाख रुपये आहे. सविस्तर वाचा..
कोल्हापूर : मराठा आरक्षण आणि समाजाच्या इतर मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. आज 17 जून रोजी सायंकाळी पाच वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांची उपस्थिती असणार आहे. या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती सुद्धा उपस्थित राहणार असून, त्यांच्यासोबत मराठा समाजातील प्रमुख समन्वयक देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संभाजीराजेंनी केलेल्या मागण्यांवर काय निर्णय होतो? हे पाहावे लागणार आहे. सविस्तर वाचा..
नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट असून दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासांत 67 हजार 208 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,03,570 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पण कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या ही अजूनही चिंता वाढवणारी आहे. गेल्या 24 तासांत 2,330 रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - मनसूख हिरेन हत्या प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनआयएकडून रात्री उशिरा प्रदीप शर्मा यांच्या घराची झडती घेण्यात आली. तसेच शर्मा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी दोन वेळा शर्मा यांची एनआयने चौकशी केली होती. सविस्तर वाचा..
नवी दिल्ली - एक महत्त्वपूर्ण सुधारात्मक पाऊल उचलत केंद्र सरकारने बुधवारी सुमारे 200 वर्ष जुन्या आयुध फॅक्टरी बोर्डाच्या पुनर्रचनेस मान्यता दिली. आयुध कारखान्यांची क्षमता वाढविणे तसेच त्यांना स्पर्धेसाठी तयार करणे हा त्याचा हेतू आहे. 41 आयुध कारखान्यांना सात कंपन्यांमध्ये विलीन केले जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी सुमारे दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या या सुधार प्रक्रियेला मंजुरी दिली. सविस्तर वाचा..