बारामती - आज ३ जून हा जागतिक सायकल दिन म्हणून ओळखला जातो. आजच्या काळात शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबरच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी सायकल चालवणे महत्त्वाचे बनले आहे. बारामतीतील राधिका संजय दराडे ही युवती गेल्या तीन वर्षापासून दररोज १०० किमी सायकलिंग करते. तिने आजवर विविध सायकलिंग स्पर्धेत भाग घेऊन प्राविण्य मिळवले आहे. राधिकाने महाराष्ट्रसह उत्तराखंड, कर्नाटक, हैदराबाद आदी ठिकाणच्या स्पर्धेत भाग घेतला आहे. उत्तराखंड येथील सायकलिंग स्पर्धेत तिला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे राधिकाची पटियाला येथील साई अकॅडमी मध्ये निवड झाली आहे. सविस्तर वाचा..
बीड - अप्पा... ऊस तोड मजूर बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही संपूर्ण जीवनभर संघर्ष करत राहिलात. मी तुमच्या नावाने ऊसतोड मजूर महामंडळ स्थापन केले आहे. ऊसतोड मजूर बांधवांच्या कल्याणासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य वेचेन... अशी भावनिक पोस्ट सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने केली आहे. सविस्तर वाचा..
रत्नागिरी - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. कोरोनाची ही साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. 9 जूनपर्यंत हा कडक लॉकडाऊन असणार आहे, या लॉकडाऊनची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या लॉकडाऊनमध्ये मेडिकल सुरू असणार आहेत. तर कृषी दुकाने, तसेच बँका आणि वित्तीय संस्था दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू असतील. इतर किराणा दुकाने, चिकन, मटण, मच्छि दुकाने पुर्णतः बंद असणार आहेत. तर दुधाची फक्त घरपोच सेवा देता येणार आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सविस्तर वाचा..
गोंदिया - आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील चोरीच्या गुन्हात अटक केलेल्या आरोपी राजकुमार अभयकुमार धोती (30) याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. हे प्रकरण सी.आय.डी.च्या ताब्यात देण्यात आले होते. शवविच्छेदन अहवालानंतर व सी.आय.डी. तपासानंतर त्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव हे पसार होते. अखेर त्याला मंगळवारी अटक करण्यात आले. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडीत देण्यात आली आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या 5600 कोटी रुपयांच्या मालमत्ता परत मिळविण्यास एसबीआयच्या नेतृत्त्वाखालील बँकांनी न्यायालयाकडे कन्सोर्टियमची विनंती केली होती. त्यावर दोन स्वतंत्र आदेशानुसार, प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (पीएमएलए) विशेष न्यायालयाने जप्तीची कारवाई करण्यास मान्यता दिली आहे. 24 मे रोजी दिलेल्या आदेशाद्वारे न्यायालयाने सुमारे 4,233 कोटींची मालमत्ता आधीच रिस्टोर केली. उरलेल्या 1,411 कोटी रुपयांच्या मालमत्तेशी संबंधित आदेश न्यायालयाने दिले आहेत. या दोन्ही आदेशात कोर्टाने विजय मल्ल्या हा प्रथम दर्शनी कंपन्यांचा गैरव्यवहार आणि बँकांच्या निधीच्या गैरव्यवहारात सामील होता, असे मान्य केले आहे. सविस्तर वाचा..
औरंगाबाद - किरण शेषराव मोरे (२४) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने मित्राला मेसेज पाठविला की, मी आत्महत्या करतोय, मित्राकडे १८ हजार रुपये आहेत. त्याच्याकडून घेऊन ते वडिलांना दे असे सांगून पोलीसाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना क्रांती चौक पोलीस कॉलनीत घडली. सविस्तर वाचा..
पिंपरी-चिंचवड (पुणे) -पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी चोरणाऱ्या टोळीला भोसरी MIDC पोलिसांनी जेरबंद केले. टोळीकडून 16 लाखांच्या एकूण 24 दुचाकी आणि 4 वाहन हस्तगत केली आहेत. यामध्ये बुलेटसह इतर महागड्या दुचाकी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी आकाश केरनाथ बधे, विलास बाळशीराम मोरे, अक्षय अभिमान जाधव, ऋषिकेश शांताराम पिंगळे यांना अटक केली आहे. सविस्तर वाचा..
गडचिरोली - बिनागुंडा महाराष्ट्राचे पूर्वेकडील शेवटचे टोक! माडीया जमातीचा अधिवास आणि अतिमागास, अतिदुर्गम व नक्षल प्रभावित असलेल्या या भागाला 'अबुजमाड ' या नावाने संबोधले जाते. नक्षलवाद्यांच्या मते हा भाग ' मुक्त क्षेत्र '(Liberated Zone) मानला जातो. भारत सरकारने या भागाला असुरक्षित क्षेत्र मानले आहे. या परिसरात कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजन राबवणे आणि लसीकरण करणे एक प्रकारचे आव्हानच होते. मात्र प्रशासनाने जोखीम पत्करत कोरोनाचा प्रसार, त्यासंबंधित प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरण याबाबत जनजागृती करत हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले आहे. सविस्तर वाचा..
औरंगाबाद - बजाजनगरातील एस.टी. कॉलनीत बुधवारी (दि. २) सकाळी एका ४५ वर्षीय अनोळखी महिलेचा अर्धनग्न व दोन्ही हात ओढणीने बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. खून करून महिलेचा मृतदेह या ठिकाणी टाकला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सविस्तर वाचा..
मुंबई- बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याला विनाकारण घराबाहेर पडणे चांगलेच महागात पडले आहे .कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये विनाकारण संध्याकाळी घराबाहेर पडून रस्त्यावर फिरणाऱ्या टायगर श्रॉफच्या विरोधात मुंबई पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वाचा..