मुंबई - राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने पुन्हा वेगाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. या आठवड्यात राज्यात आता दररोज ३ हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामध्ये विदर्भातील अमरावती, अकोला यवतमाळ, वर्धा या ठिकाणची संख्या लक्षणीय आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून या तिन्ही जिल्ह्यात आजपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; अमरावती, वर्ध्यात संचारबंदी लागू
मुंबई - गेल्या आठवड्यापासून राज्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून महानगरपालिकेने कारवाईला पुन्हा सुरुवात केली आहे. रेस्टॉरंट्स, बार आणि हॉटेल्सवर पालिकेच्यावतीने धडक कारवाई केली जात आहे.
सविस्तर वृत्त - वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे बीएमसी अलर्ट; वांद्र्यात ६५० जणांना दंड तर, १४५ कॅफे-बारवर गुन्हे
मुंबई - राज्यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज शनिवारी (दि.20) महाराष्ट्रात 6281 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना संक्रमण वाढत असून मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आज 40 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 51 हजार 753 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.16 टक्के तर मृत्यूदर 2.47 टक्के झाला आहे. विदर्भातील स्थिती अधिकच चिंताजनक बनली असून आज एकट्या अमरावती जिल्ह्यात 1058 रुग्ण सापडले आहेत. ही वाढ मुंबई, पुणे या शहरांपेक्षा मोठी असल्याने अमरावतीकरांसाठी चिंतेची बाब आहे.
सविस्तर वृत्त - दिलासा नाहीच, आज पुन्हा 6281 नवे रुग्ण; अमरावतीत मुंबईपेक्षा अधिक बाधित
मुंबई - कोविड काळातही राज्य शासनाने विकास थांबविला नाही, आलेल्या संकटावर मात करीत आम्ही मार्ग काढत होतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते आज नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत बोलत होते. ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. कोविडचा लढा संपलेला नाही. आपणही व्हीसी वगैरेंच्या माध्यमातूनच भेटतो आहोत. कार्यालयीन वेळच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सविस्तर वृत्त - कार्यालयीन वेळांची १० ते ५ ही मानसिकता बदलण्याची गरज - मुख्यमंत्री
अमरावती - शहरात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विनामास्क उपस्थित राहणे तसेच कोरोनाचे नियम पायदळी तूडवल्याप्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यासह युवा स्वाभिमानच्या पंधरा कार्यकर्त्यांवर अखेर फ्रेंजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त - अखेर राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल; कोरोना नियमांचे पालन न करणे भोवले
मुंबई - भाजपचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून, त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व घेतल्याची तक्रार मला मिळाली होती. त्या तक्रारीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी चालु आहे. रुबेल जोनू शेख याला अटक करण्यात आली असून, चौकशीत तो बांगलादेशी असल्याचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
सविस्तर वृत्त - भाजपचा 'तो' पदाधिकारी बांगलादेशीच- गृहमंत्री अनिल देशमुख
बारामती- बर्ड फ्लूमुळे अनेक पोल्ट्री व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांना असे वाटते की नुकसान झाले की ते सरकारने द्यावे. परंतु यंदा सरकारच्या तिजोरीत १ लाख कोटींचा कर कमी आला आहे. केंद्राकडूनही ३० हजार कोटी रुपये कमी आले आहेत. बाकीचा ७० हजार कोटींचा कर मिळायला पाहिजे होता, तो मिळालेला नाही. असे असतानाही पुढे राज्य सरकारचा गाडा चालवायचा आहे. अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. ते बारामतीमध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
सविस्तर वृत्त - यावर्षी करामध्ये 1 लाख कोटींची घट - अजित पवार
मुंबई - 1 मार्च पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय आशिवेशनवर कोरोनाचे सावट आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनावर अंतिम निर्णय 25 फेब्रुवारीला होणाऱ्या विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन नेमकं किती दिवस होणार यावर तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.
सविस्तर वृत्त - तब्बल दीड हजार मुलींकडून लग्नाला नकार; तरुणाचा व्यवसायच करण्याचा ठाम निर्णय
मेलबर्न - वर्षाची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या महामुकाबल्यामध्ये आज दोन नामवंत खेळाडू एकमेकासंमोर उभे ठाकणार आहेत. 'वर्ल्ड नंबर वन' सर्बियाचा दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविच आणि रशियाचा 'स्टार' खेळाडू डॅनिल मेदवेदेव यांच्यात पुरुष एकेरीचा अंतिम सामना रंगणार आहे. ‘मेलबर्न पार्कचा राजा’ म्हणून ओळख असलेला जोकोविच आपल्या १८व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
सविस्तर वृत्त - ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आज 'महामुकाबला'
मुंबई - बहुप्रतीक्षित झुंड हा चित्रपट अखेर १८ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची पुष्टी अमिताभ बच्चन यांनी शुक्रवारी दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शन सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले आहे.
सविस्तर वृत्त - नागराज मंजुळे आणि अमिताभ यांचा 'झुंड' १८ जुनला होणार रिलीज