ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... - आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top ten news stories around the globel
Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...
author img

By

Published : Jun 17, 2021, 3:07 PM IST

Updated : Jun 17, 2021, 10:58 PM IST

  • मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एनआयएने आज मुंबई पोलिसांतील माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह तीन जणांना अटक केली आहे. त्यानंतर आज प्रदीप शर्मा यांना एनआयएच्या विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना 28 जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एनआयएकडून आज सकाळी 6 च्या सुमारास प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील जे. बी. नगर निवास स्थानी छापेमारी करण्यात आली. ही छापेमारी जवळपास 4 ते 5 तास चालली. यावेळी काही महत्त्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर
  • मुंबई - कोरोनाकाळात नागरिकांना सोयी सुविधा देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगे भडकवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल, असा अंदाज वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. देशात दंगे होऊ नयेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकराने 'प्रॉफिट मोहम्मद अ‌ॅण्ड अदर रिलिजियस हेड्स प्रोहायबीशन ऑफ स्ल्यानंडर ऍक्ट, 2021 कायदा' मंजूर करावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. हा कायदा विधानसभा, संसदेत मांडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. वाचा सविस्तर
  • मुंबई - भाजपा आणि कॉंग्रेसने आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून याबाबत कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी सोबतच्या युतीबाबत मत व्यक्त केले आहे. वाचा सविस्तर
  • मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात आतापर्यंत 7 जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केल्यानंतर यामध्ये आठवी अटक करण्यात आलेली आहे. मुंबई पोलीस खात्यातील विवादात राहिलेले माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. या अगोदर काही दिवसांपूर्वी प्रदीप शर्मा यांची तब्बल 7 तास चौकशी केली होती. मात्र यानंतर आनंद जाधव आणि संतोष शेलार या दोन आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून हिरेन मनसुख यांची हत्या केल्यानंतर त्यातील सबळ पुरावे नष्ट करण्याच्या प्रकरणांमध्ये प्रदीप शर्मा यांचा मोठा हात असल्याचं समोर आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी प्रदीप शर्मा यास अटक केली आहे. वाचा सविस्तर
  • रायगड - रेवदंडा येथील समुद्रात बार्ज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बार्जवर 16 खलाशी होते. या खलाशांना हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. वाचा सविस्तर
  • मुंबई - मुंबई उच्च न्यायालयात कोरोना संदर्भातील याचिकांवर आज सुनावणी करताना विनापरवाना रेमडेसिवीर औषध वाटपचा मुद्दा परत चर्चेत आला. विनापरवाना रेमडेसिवीरचे वाटप केल्याबद्दल हायकोर्टाने गंभीर निरीक्षणे नोंदवली. दरम्यान, या प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिला आहे, की कोरोना औषधांसदर्भात सोनू सुद यांनी केलेल्या मदतीची सखोल चौकशी करण्यात यावी. परवाना नसतानाही ही औषधे कशी मिळवली आणि वितरीत केली, याची चौकशी व्हायला हवी, असे न्यायालयाने म्हटले आहे. वाचा सविस्तर

  • रत्नागिरी - जिल्ह्यात सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील जगबुडी, नारंगी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जगबुडीची धोक्याची पातळी 6 मीटर आहे. मात्र आज (गुरूवारी) सकाळी जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्या जगबुडी नदीची पाणीपातळी 6.75 मीटर एवढी आहे. त्यामुळे प्रशासनही सतर्क झाले आहे. बहीरवली, सुसेरी यासह खाडीपट्टयातील १५ गावाकडे जाणाऱ्या या रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प आहे. तर चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला पूर आल्याने पाणी शहरातील बाजारपेठेत घुसले आहे. वाचा सविस्तर
  • कोल्हापूर- मराठा समाजाच्या मागणीसंदर्भात आज मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा होणार आहे. ही चर्चा सकारात्मक होईल अशी अपेक्षा आहे. मात्र ही चर्चा सकारात्मक नाही झाली तर काय होईल? ते मला सांगायची गरज नाही. नकारात्मक चर्चा झाली तर आंदोलनावर ठाम आहोत. असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिला. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सायंकाळी पाच वाजता बैठक होणार आहे. या बैठकीसाठी आज खासदार संभाजीराजे छत्रपती मुंबईकडे रवाना झाले. वाचा सविस्तर
  • मुंबई - हल्ली चित्रपटसृष्टीत एक नवीन ट्रेंड सुरु झालाय तो म्हणजे गाजलेल्या, नावाजलेल्या चित्रपटांचा वर्धापनदिन साजरा करण्याचा. अलीकडेच अनेक चित्रपटांच्या ‘ऍनिव्हर्सरीज’ साजऱ्या होताना सर्वांनी बघितलंच असेल. तर ‘लगान’ या चित्रपटाला नुकतीच २० वर्ष पूर्ण झाली आणि त्याची २०वी ऍनिव्हर्सरी थाटामाटात साजरी झाली. वीस वर्षांपूर्वी आमिर खानचा प्रसिद्ध आणि संस्मरणीय क्रीडापट 'लगान' प्रदर्शित झाला होता, ज्याने मुख्य प्रवाहातील हिंदी सिनेमाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत केली. ए.आर. रहमान यांचे अफलातून संगीत या चित्रपटाची खासियत होती आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा विस्तृत कॅनवास आणि आमिर खान आणि इतर सर्व कलाकारांनी केलेल्या दमदार अभिनयाने हा चित्रपट सजला होता. परंतु चित्रपट बनविताना अनेक चांगल्या-वाईट गोष्टी घडत असतात ज्या प्रेक्षकांसमोर येत नाहीत. ‘लगान’ संदर्भात अशाच अज्ञात गोष्टींवर टाकलेली ही नजर. वाचा सविस्तर

Last Updated : Jun 17, 2021, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.