- मुंबई - राज्यात बुधवारी (दि. 9 जून) दिवसभरात 16 हजार 369 रुग्ण करोनातून बरे झाले असून 10 हजार 989 नव्या कोरोनाग्रस्त आढळून आले. 261 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे. वाचा सविस्तर
- पुणे - राज्यात नियोजित वेळेच्या आधीच दाखल झालेले नैऋत्य मौसमी वारे अर्थात मान्सूनने बुधवारी मुंबई कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये दमदार हजेरी लावली असून मान्सूनची आगेकूच लक्षात घेता येत्या 3 दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. वाचा सविस्तर
- मुंबई - मुंबईत काल रात्रीपासून पाऊस पडत होता. पहाटेपासून पावसाने जोर पकडल्याने मुंबईची तुंबई झाली. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. त्यातच हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने मुंबईकर चिंतेत होते. मात्र, सायंकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर
- पुणे - पिरंगुट एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी कंपनी मालक निकुंज शहा (वय 39 रा. सहकारनगर) याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री त्याला अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर निकुंज शहा याला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आगी प्रकरणी निकुंज शहा याच्यासह बिपिन शहा (वय 68) पुणे केयुर बिपिन शहा (वय 41) त्यांच्या विरोधातही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
- मुंबई - मुंबईमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या तीन ते चार तासात आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट मुंबई जारी करण्यात आला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. वाचा सविस्तर
- मुंबई - मुंबईत पावसाने रात्रीपासून हजेरी लावली आहे. शहरात अनेक ठिकाणी पाऊस पडत असल्याने सखल विभागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सायन, हिंदमाता, किंग सर्कल येथे पाणी साचले आहे. यामुळे पालिकेने केलेला नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. वाचा सविस्तर
- मुंबई - हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले आहे. पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर
- नाशिक - अनैसर्गिक कृत्य करण्यास नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना मालेगावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. फैजान अख्तर अब्दुल रेहमान असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे. वाचा सविस्तर
- मुंबई - अभिनेता विक्की कौशल आणि कॅटरिना कैफच्या कथित रोमान्सची चर्चा सध्या मनोरंजन जगतात रंगत असते. दोघांनीही आपल्या नात्याबद्दलचा खुलासा केलेला नाही. परंतु अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर याने विक्की आणि कॅटरिनाच्या रिलेशन स्टेटसबद्दल प्रतिक्रिया दिल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. वाचा सविस्तर
- मुंबई - काही परदेशी क्रिकेटपटूंनी आयपील खेळण्यास नकार दिलेला असला तरी बीसीसीआयने तितक्याच उत्साहाने या स्पर्धेचे आयोजन करण्याचे टरवले आहे. उर्वरित आयपीएल (IPL) स्पर्धा रोमांचक बनावी यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिध्द झाले नसले तरी ही स्पर्था १९ सप्टेंबर रोजी सुरू होणार असून १५ ऑक्टोबर रोजी अंतिम सामना खेळला जाणार असल्याचे निश्तिच झाले आहे. वाचा सविस्तर
Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Last Updated : Jun 9, 2021, 10:42 PM IST