- मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हातील एफआयआरमधील काही भाग वगळण्यासाठी राज्य सरकारच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी देशमुखांच्या दोन भिन्न याचिकांवर एकाचवेळी सुनावणी करणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेही ही सुनावणी 10 जूनपर्यंत तहकूब केली. वाचा सविस्तर
- सातारा - कोरोनावर उपचार घेऊन पूर्ण बरा झालेल्या युवकाला त्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा फोन आल्याने युवकासह कुटुंबीयांचे धाबे दणाणले आहेत. एखादा हिंदी चित्रपटाच्या कथानकाला साजेसी ही सत्यघटना फलटण शहरात घडली आहे. फलटण शहरातील मंगळवार पेठेत राहणारा सिद्धांत मिलिंद भोसले (वय २०) असे या युवकाचे नाव आहे. गेल्या महिन्यात त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्याने खासगी रुग्णालयात उपचारही घेतले. गेल्या महिन्याभरापासून तो ठणठणीत आहे. वाचा सविस्तर
- पुणे - पिरंगुट एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी कंपनी मालक निकुंज शहा (रा. सहकारनगर) याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यात 15 महिलांचा समावेश आहे, तर 3 पुरुषांचा समावेश आहे. वाचा सविस्तर
- मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार. आज राज्यात 10 हजार 891 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 58 लाख 52 हजार 891 इतकी झाली आहे. असे असले तरी आज राज्यात 16 हजार 577 इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आत्तापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या 55 लाख 80 हजार 925 इतकी झाली आहे. एका बाजूला कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी कोरोनामुळे मृत होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात 24 तासांत 295 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर
- मुंबई - आरक्षणसंदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू केली याचा आनंदच आहे. त्यामुळे काहीही कृती न करता फक्त केंद्र सरकारला भेटून काही उपयोग नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे सकारात्मक दृष्टीने पाहू, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदी-ठाकरे भेटीनंतर दिली आहे. वाचा सविस्तर
- नवी दिल्ली : येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी झालेल्या चर्चेविषयीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना दिली. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भातील चर्चेबद्दल अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. वाचा सविस्तर
- अमरावती -खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. जास प्रमाणपत्र बोगस असल्याचं सांगत न्यायालयाने राणांना 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. माजी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. वाचा सविस्तर
- नवी दिल्ली - एका वर्षानंतर दिल्लीत आलो. सर्वांनाच या भेटीचे कारणही माहित आहे. व्यवस्थित चर्चा झाली. सर्व विषय गांभीर्याने त्यांनी एकून घेतली. या विषयात ते लक्ष घालणार, असे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे मांडलेले विषय ते सकारात्मक पद्धतीने ते सोडवतील असा विश्वास आहे. वाचा सविस्तर
- पुणे - मुळशी तालुक्यातील पिरंगुड येथील उरवडे येथील एसव्हीएस कंपनीत लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख पटवणे कठीण आहे. मृत नातेवाईकांचा डीएनए करूनच मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे. यासाठी तीन दिवस लागणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. वाचा सविस्तर
- जळगाव - जनक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील अंजनविहिरे गावात 3 दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. कैऱ्या तोडल्या म्हणून शेतमालकासह सालदाराने दलित समाजातील एका अल्पवयीन मुलाला 2 तास झाडाला बांधून ठेवले. त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून तो व्हाट्सअपवर व्हायरल पण केला. धक्कादायक म्हणजे, शेतमालकाने त्या मुलाच्या अंगावर लघवी देखील केली. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात शेतमालकासह सालदारावर गुन्हा दाखल झाला असून, दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. वाचा सविस्तर
Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... - देशातील महत्त्वाच्या बातम्या
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...

Last Updated : Jun 8, 2021, 10:51 PM IST