- पुणे - मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला आज (सोमवार)दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. १९ कामगारांना वाचवण्यात यश आले असून, यामध्ये काहीजण गंभीर जखमी झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, या दुर्घटनेबाबत दुःख देखील व्यक्त केले आहे. सविस्तर वाचा..
- पुणे - पिरंगुट एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कंपनीला (pune fire news) आग लागून 18 कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पिरंगुटजवळ असलेल्या उरवडे येथील SVS AquaTechnologies या कंपनीत ही आगीची घटना घडली आहे. आग लागली त्यावेळी कंपनीत 37 कामगार होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. सविस्तर वाचा..

- कराड (सातारा) - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना भारतात मात्र पेट्रोल १०० रुपये, डिझेल ९२ तर स्वयंपाकाचा गॅस ९०० रुपयांवर पोहोचला आहे. केंद्रातील मोदी सरकारची ही दरवाढ नसून जनतेच्या खिशातून करवाढ वसुली असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधील पत्रकार परिषदेत केला आहे. मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीतून कर रूपाने कोटी रुपये नफा मिळवित सामान्यांना महागाईच्या खाईत लोटले असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. सविस्तर वाचा..
- मुंबई - राज्य सरकारने १४ एप्रिलपासून लॉकडाऊन लावला आहे. हा लॉकडाऊन शिथिल कारण्यासाठी पाच स्थर करण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबईचा समावेश तिसऱ्या स्थरात केला गेला आहे. दुसऱ्या आणि पहिल्या स्थरात आल्यास मुंबईमधील लॉकडाऊन पूर्णतः उठवता येणार आहे. त्यासाठी पालिकेने कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यासाठी पाऊले उचलली आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सविस्तर वाचा..
- नागपूर - माझ्याकडे रागाने का पाहतो एवढ्या क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना नागपूरच्या कपिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत म्हाडा कॉलनी परिसरात घडली आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. विनय राबा आणि कुणाल वाघमारे अशी जखमी तरुणांची नावे आहेत. सविस्तर वाचा..
- भंडारा - ईंधन दरवाढीच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी भंडारा शहरात मिस्कीन टॅंक परिसरात पेट्रोल पंपसमोर भंडारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. सविस्तर वाचा..
- मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळील माझगाव व डोंगरी यांना जोडणाऱ्या ब्रिटीशकालीन हॅकॉक पूल धोकादायक झाल्याने पाडण्यात आला आहे. या पुलाच्या पुनर्बाधणीतील महत्वाचा टप्पा असलेला दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ६ जून रोजी पूर्ण करण्यात आले. हा आव्हानात्मक आणि महत्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने या पुलाच्या पुनर्बाधणीला आणखी वेग येणार असल्याची माहिती पालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. सविस्तर वाचा..
- देशात कोरोनाचा प्रसार झाला असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात युद्ध सुरू असतानाच ‘म्यूकरमायकोसिस’ या आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता अधिक वाढली आहे. कोरोनामुक्त झाल्यावर ‘म्यूकरमायकोसिस’ या आजाराचा सामना रुग्णाला करावा लागत आहे. म्यूकरमायकोसिस हा धोकादायक असून याकडे दुर्लक्ष केल्यास डोळे निकामी होतात. सविस्तर वाचा..
- भोपाळ : मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यामध्ये सोमवारी एक दुर्घटना घडली. पेट्रोल पंपाजवळून जाणाऱ्या एका दुचाकीला अचानक आग लागली. ही आग लागताच चालकाने दूर उडी मारुन आपला जीव वाचवला. मात्र, आग एवढी भयानक होती, की गाडीचा जळून कोळसा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाने ही आग शमवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत ही गाडी पूर्णपणे जळून गेली होती. पाहा याचा थरारक व्हिडिओ.. सविस्तर वाचा..
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - देशातील महत्त्वाच्या बातम्या
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 1 PM

Last Updated : Jun 8, 2021, 1:55 PM IST