ETV Bharat / bharat

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - देशातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @  1 PM
Top 10 @ 1 PM
author img

By

Published : Jun 6, 2021, 6:41 AM IST

Updated : Jun 6, 2021, 1:13 PM IST

  1. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या तीन महिन्यात शनिवारी प्रथमच 95 टक्क्यांवर गेले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी राज्यात 13 हजार 659 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सविस्तर वाचा..
  2. मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या तीन महिन्यात आज प्रथमच 95 टक्क्यांवर गेले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, आज राज्यात 13 हजार 659 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सविस्तर वाचा..
  3. हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील वारंगा ते बाळापूर मार्गावर असलेल्या दाती फाटा येथे प्रेमसंबधातून एकाचा खून करून मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे गतीने फिरवून अवघ्या सहा तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर अपघाताचा बनाव करून पुरवा नष्ट करण्यासाठी हा प्रयत्न केला असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा..
  4. मुंबई - भारताचे गोंधळलेले सरकार हे कोरोनाचा संसर्ग रोखण्याऐवजी कृतीचे श्रेय घेण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे स्किझोफ्रेनियासारखी अवस्था होऊन मोठी संकटे निर्माण होत असल्याचे मत नोबेल पारितोषिक प्राप्त अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रसेवा दलाच्या कार्यक्रमात शुक्रवारी बोलत होते. सविस्तर वाचा..
  5. बीड - मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नाकडे ठाकरे सरकारने कधीच जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही. याचा परिणाम महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. मात्र, आता मराठा समाज शांत बसणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नाकडे दुर्लक्ष कराल तर याद राखा, आम्ही तुम्हाला घरी बसवल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी जिसा आहे. ते बीडमध्ये बोलत होते. आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. 5 जून) निघालेल्या या मोर्चामध्ये मराठा समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती. सविस्तर वाचा..
  6. नांदेड - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाऊंडेशन तर्फे नांदेड शहर परिसरात हरित नांदेड अभियानांतर्गत गत दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या सहकार्याने वृक्ष लागवड मोहीम सुरू आहे. हरित नांदेड या योजनेच्या तिसर्‍या पर्वाचा शुभारंभ आज पर्यावरणदिनी 'एक व्यक्ती एक झाड' योजनेंतर्गत वृक्ष दत्तक योजनेद्वारे विसावा गार्डन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाद्वारे झाला. सविस्तर वाचा..
  7. चंद्रपूर : प्रेयसीचा बदला घेण्यासाठी आरोपीने तिच्यावर अत्याचार करत चक्क व्हिडिओ काढला. प्रेयसीच्या वाढदिवशी हा व्हिडिओ फेसबुकवर टाकून आपण तिचा बदला घेत असल्याचे सांगण्यात आले. हा धक्कादायक प्रकार बल्लारपूर येथे घडला आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. सविस्तर वाचा..
  8. एचआयव्ही आणि हेपटायटिस आईमुळे तिच्या होणाऱया बाळाला संसर्ग होऊ शकतो. मात्र, कोरोनाचा संक्रमण आईद्वारे बाळाला होत नाही. जवळपास 250 कोरोनाबाधित महिलांनी स्वस्थ आणि कोरोना निगेटिव्ह बाळाला जन्म दिला आहे. हा एक सकारात्मक विकास असल्याचे आगरतला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख तमन मजूमदार यांनी सांगितले. सविस्तर वाचा..
  9. हैदराबाद - देशात कोरोनाचा कहर असून विदारक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो पैसे भरूनही रुग्ण हाती लागत नाहीये. काही ठिकाणी रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशीच एक घटना हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयामध्ये घडली आहे. तब्बल 52 लाख रुपये फीस भरल्यानंतरही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सविस्तर वााचा..
  10. नवी दिल्ली -अमेरिकेची ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हिकल एलएलसी कंपनीही भारतीय बाजारात येणार आहे. या कंपनीची इलेक्ट्रिक कार ही टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारहून अधिक चांगली असल्याचे केंद्रीय एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते. सविस्तर वाचा..

सविस्तर बातम्यांसाठी येथे क्लिक करा..

Last Updated : Jun 6, 2021, 1:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.