- मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या तीन महिन्यात आज प्रथमच 95 टक्क्यांवर गेले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, आज राज्यात 13 हजार 659 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. वाचा सविस्तर
- मुंबई - मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर आता महाराष्ट्रात कधी दाखल होणार याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. राज्यासाठी एक चांगली बाब चांगली मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सून रेषा राज्यात, दक्षिण कोकणात हर्णेपर्यंत, दक्षिण-मध्य महाराष्ट्रात सोलापूरपर्यंत, मराठवाड्याचा काही सलग्न भागाची परिस्थिती पुढच्या वाटचालीसाठी अनुकुल आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करत दिली आहे. वाचा सविस्तर
- मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात अक्षरश: थैमान घातले होते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. याचमुळे राज्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान, ब्रेक-द-चेन (BreakTheChain) अंतर्गत आज नवे आदेश काढण्यात आले आहेत. राज्यात सरसकट शिथिलता नसून स्थानिक प्रशासन आपापल्या भागासाठी निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे या आदेशात सांगण्यात आले आहे. वाचा सविस्तर
- मुंबई - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते आज वरळी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यंदाच्या मोसमातील वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर आज दिवसभरात मुंबईत ८३ ठिकाणी १ हजार २०० पेक्षा अधिक झाडांची लागवड करण्यात आली. तसेच मुंबईत विविध ठिकाणी एकूण ४,८०० रोपट्यांचे वाटपदेखील करण्यात आले, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. वाचा सविस्तर
- बीड - मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नाकडे ठाकरे सरकारने कधीच जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही. याचा परिणाम महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. मात्र, आता मराठा समाज शांत बसणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नाकडे दुर्लक्ष कराल तर याद राखा, आम्ही तुम्हाला घरी बसवल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी जिसा आहे. ते बीडमध्ये बोलत होते. आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. 5 जून) निघालेल्या या मोर्चामध्ये मराठा समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती. वाचा सविस्तर
- मुंबई- केंद्र सरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्याऐवजी देशाचा एक चार्ट बनवून देशातील जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे. परंतू बैठका घेऊन फक्त या महिन्यात १२ कोटी, डिसेंबरपर्यंत २१० कोटी लसी उपलब्ध होईल, असे सांगणे किती योग्य आहे, असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार याची माहिती दिली पाहिजे. केंद्र किती खरेदी करणार, राज्यांना किती मिळणार आणि खासगी लोकांनी खरेदी करुन त्यांनी त्याचा वापर किती करावा याबाबतची स्पष्टता केंद्र सरकारने आजपर्यंत जाहीर केली नसल्याचा आरोपही मलीक यांनी केला आहे. वाचा सविस्तर
- दिल्ली - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्ल्यू टिक हटवण्यात आली होती. मात्र, काही काळानंतर ट्विटरकडून नायडू यांच्या अकाऊंटवरील ब्ल्यू टीक रिस्टोर केली आहे. ब्ल्यू टिक असलेले अकाऊंट हे अधिकृत अकाऊंट असल्याचे प्रमाण आहे. वाचा सविस्तर
- मुंबई - कोरोनाच्या प्रसारामुळे राज्य सरकारने राज्यात १४ एप्रिलपासून लॉकडाऊन लावला आहे. रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने सरकारने लॉकडाऊन टप्प्याटप्पयाने उठवण्याचा निणर्य घेतला आहे. सरकराने जाहीर केल्यानुसार पॉझिटिव्हिटी रेटप्रमाणे मुंबई तिसऱ्या तर बेडच्या संख्येनुसार पहिल्या टप्यात आहे. मुंबई पहिल्या की तिसऱ्या टप्प्यात अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पॉझिटिव्हिटी रेटप्रमाणे मुंबई तिसऱ्या टप्यात असल्याने मुंबईमध्ये काही निर्बंधांसह व्यवहार सुरु राहणार आहेत. तर सामान्य प्रवाशांना लोकल ट्रेनमधून प्रवासाची मुभा नसणार आहे. वाचा सविस्तर
- वर्धा - सेवाग्राम येथे बँकेत खोटा बॉंम्ब अंगाला गुंडाळून ५५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे. स्वत: सुसाईड बॉम्बर असल्याचे भासवत तो कर्माचाऱ्यांना धमकवण्याचा प्रयत्न करत होता. चौकशीअंती आरोपीने कर्जबाजारीपणामुळे हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. वाचा सविस्तर
- मुंबई - अभिनेता पर्ल पूरी याला अत्याचाराच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुंबई वालीव पोलिसांनी ही कारवाई केली. त्याच्यावर त्याच्या एका महिला सहकलाकाराच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. वाचा सविस्तर
Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Last Updated : Jun 5, 2021, 10:49 PM IST