ETV Bharat / bharat

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - देशातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @  1 PM
Top 10 @ 1 PM
author img

By

Published : May 22, 2021, 6:55 AM IST

Updated : May 22, 2021, 1:18 PM IST

  • मुंबई - तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या 'पी 305 बार्ज'वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून सुरू आहेत. आतापर्यंत 188 कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. आतापर्यंत 60 कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. मिळालेल्या मृतदेहांपैकी २३ जणांची ओळख पटली आहे. सविस्तर वाचा..
  • गुजरात - म्यूकरमायकोसिसनंतर आता पांढर्‍या बुरशीजन्य संसर्गाची गुजराततमध्ये नोंद झाली आहे. अहमदाबाद येथिल सोला सिव्हिल रुग्णायलामध्ये या आजाराचे ३ रुग्ण आढळले आहेत. म्यूकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) नंतर आता पांढऱ्या बुरशीचे देखील नोंद झाली आहे. ही बुरशी शरीराच्या कोणत्याही भागात उद्भवू शकते. सध्या पांढऱ्या बुरशीचे रुग्ण फार कमी प्रमाणात आढळल्याची नोंद झाली आहे. सविस्तर वाचा..
  • नागपूर - लहान मुलांच्या लसीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी भारत बायोटेक, एनआयव्ही आणि आयसीएमआरच्या माध्यमातून देशातील चार ठिकाणी लहान मुलांवर लसीची ट्रायल केली जाणार आहे. नागपुरातील मेडिट्रिना रुग्णालयातही ट्रायल होणार आहे. सविस्तर वाचा..
  • गडचिरोली - जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात शुक्रवारी सकाळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत संपूर्ण कसनसूर दलमच्या 13 जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांच्या सी-60 दलाला यश आले. ठार झालेल्या 13 नक्षलवाद्यांची ओळख पटली असून 6 पुरुष तर 7 महिलांचा समावेश होता. या 13 जणांवर एकूण 60 लाख रुपयांचे बक्षीस होते, अशी माहिती गडचिरोली पोलीस दलाने दिली आहे. सविस्तर वाचा..
  • सिंधुदुर्ग - तौक्ते वादळात ज्या लोकांचे नुकसान झाले आहे त्यांना लवकरच योग्य ती मदत मिळणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. ते सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते. कोकण आणि माझे नाते अतूट आहे. ते कोणीही तोडू शकत नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. सविस्तर वाचा..
  • मुंबई - तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेले पी-305 हे बार्ज समुद्रात बुडाले आहे. बॉम्बे हायजवळील या बार्जमध्ये 273 कर्मचारी अडकलेले होते. याची माहिती मिळताच बचावकार्य सुरू झाले आणि दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांची नौदलाकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. आतापर्यंत या घटनेमध्ये 51 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या मृतदेहांना जे जे रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आले आहे. परंतु, हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. सविस्तर वाचा..
  • पुणे - पुण्यात सराईत गुन्हेगाराची हत्या झाल्यानंतर बालाजीनगर ते कात्रज स्मशानभूमीदरम्यान त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्यविधीला 100 ते 125 दुचाकीवरून रॅली काढण्यात आली होती. शहरात शनिवारी कडक लॉकडाऊन असतानाही हा प्रकार घडला होता. याप्रकरणी नंतर कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 150 ते 200 जणांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अशाप्रकारच्या घटना वारंवार घडत राहिल्या तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करताना मागे पुढे पाहिले जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सविस्तर वाचा..
  • मुंबई - रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी (23 मे) मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भायखळा ते माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर ते वसई रोड रेल्वे स्थानकादरम्यान रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे. सविस्तर वाचा..
  • बंगळुरू - देशात कोरोनाचा कहर असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड्सची हुबळी शाखा चालवणारे मोहन एकबोटे यांचा मुलगा शशांक एकबोटेचा (वय 37) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सामाजिक कार्यातून त्याने आपली ओळख निर्माण केली होती. सविस्तर वाचा..
  • कोलकाता - पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या चार नेत्यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावणी करण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक सरन्यायाधीशांनी शुक्रवारी पाच सदस्यीय खंडपीठ स्थापन केले. त्यांना नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणात सीबीआयने सोमवारी अटक केली. 24 मे रोजी या खटल्याची सुनावणी होईल. सविस्तर वाचा..

सविस्तर बातम्यांसाठी येथे क्लिक करा..

Last Updated : May 22, 2021, 1:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.