- नवी दिल्ली - देशभरात पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने सामान्यांच्या खिशाला पुन्हा आज कात्री लागली आहे. या दरवाढीने राजस्थानमधील पाकिस्तान सीमेलगत असलेल्या श्री गंगानगर शहरात कहर केला आहे. या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक आहे. यापूर्वीच गंगानगरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०७.२३ रुपये लिटर आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - मुंबईत बुधवारपासून पावसाला सुरुवात झाली. बुधवारी मुंबईची तुंबई झाली. गेले दोन दिवस कमी प्रमाणात पाऊस पडला. मात्र, आज पुन्हा पावसाने जोर धरला, यामुळे आज पुन्हा मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. यामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. दुपारी समुद्राला मोठी भरती होती. यादरम्यान पाऊस पडत राहिला असता तर मुंबईची पुन्हा तुंबई झाली असती. मात्र, दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना सुटकेचा निश्वास टाकला. रविवारी व सोमवारी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका, असे आवाहनही हवामान विभागाने केले आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बंद दरवाज्याआड चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. एवढंच नाही. तर या भेटींनतर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत. संजय राऊत यांनी मोदींवरती उधळलेली स्तुतीसुमने, रामदास आठवले यांनी शिवसेनेला पुन्हा महायुतीत येणासाठी घातलेली साद, शरद पवार यांनी वर्धापनदिनी शिवसेनेची केलेली स्तुती तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची केलेली घोषणा आणि नितीन राऊत यांनी उद्धव ठाकरेंची केलेली पाठराखण असो, गेल्या काही दिवसांतल्या नेत्यांच्या या प्रतिक्रियांमुळे राज्याच्या राजकारणात नक्की काय चाललंय? असा प्रश्न उभा ठाकला आहे. सविस्तर वाचा...
- सांगली - आक्रमक झाल्याशिवाय शिवसेनेला धडा शिकवता येत नाही, अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. तसेच संजय राऊत हे बिनकामाचे आहेत, असा टोलाही निलेश यांनी लगावला आहे. इस्लामपूरच्या पेठ नाका येथे आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. सविस्तर वाचा...
- नांदेड- लॉकडाऊनमुळे शेतीमाल बाजारात जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल फेकून देण्याची वेळ आली. नागवेलीच्या पानाचे उत्पन्न करणारा शेतकरी यातूनही सुटला नाही. या शेतकऱ्यांनाही लाखो रुपयांचा फटका बसला होता. संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक झाल्याने नागवेली पानाची मागणी वाढली आहे. मोठ्या अवधीनंतर नागवेलीच्या पानाची मागणी वाढल्याने पान विड्याला रंग चढल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वाचा...
- नागपूर- उपराजधानी नागपूरमध्ये केवळ वैयक्तिक वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपीने १६ वर्षीय विद्यार्थी राज पांडेचा निर्घृण खून केल्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे. त्यातच आता राजने गायलेले गाणे समाज माध्यमांवर वायरल झाले. त्यापैकी 'आयेगी तुम्हे मेरी याद वफाये मुझे भूल ना पयोगे' या गाण्याने तर संपूर्ण इंदिरा मातानगर या वस्तीमधील नागरिकांना अश्रू अनावर झाले होते. सविस्तर वाचा...
- मुंबई -कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्याही कमी झाली आहे. यामुळे मुंबईमधील पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. मुंबईत ५.२५ टक्के इतका पॉझिटिव्हीटी रेट होता. एकाच आठवड्यात तो ४.४० टक्के इतका झाला आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सवर धावत्या रेल्वेत चढताना एका प्रवाशाचा तोल गेला. तोल जाऊन हा प्रवाशी फलाट आणि गाडी यांच्यातील मोकळ्या जागेत पडला. मात्र कर्तव्यावर असलेल्या रेल्वे जवान आणि रेल्वे गार्डने स्वतःचा जीव धोक्यात घालून, प्रसंगावधान दाखवत प्रवाशाचा जीव वाचवला आहे. हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सविस्तर वाचा...
- नागपूर - राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटी दरम्यान कोणत्या विषयांवर खलबत झाले असतील या संदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. कोणी कोणाला भेटावे यासंदर्भात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र, कोणी कितीही स्ट्रॅटजी तयार केली तरी २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकी नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल, यात शंका नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सविस्तर वाचा...
- मुंबई - शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. प्रशांत किशोर यांनी विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असा मुद्दा शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उपस्थित केल्याची चर्चा आहे. मात्र, शरद पवार विरोधी पक्षाच्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार होतील का, असा सवाल उपस्थित झाला आहे. सविस्तर वाचा...
Top 10 @ 11 PM : रात्री अकरापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या!
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Last Updated : Jun 12, 2021, 10:55 PM IST