- मुंबई : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाऊन वाढवला आहे. 'ब्रेक दि चेन' अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध एक जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत. काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत एकमताने याबाबत निर्णय घेण्यात आला होता. आज याचा शासन आदेश काढण्यात आला. सविस्तर वाचा..
- गडचिरोली - जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात सावरगाव लगतच्या मोरचूल जंगलात आज (गुरुवारी) सकाळी गडचिरोली पोलीस दलाचे सी-६० कमांडोचे नक्षल विरोधी अभियान सुरू होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला जवानांनी प्रतिउत्तर दिले. यावेळी अर्ध्या तासाच्या चकमकीनंतर दोन नक्षल्यांना ठार मारण्यात आले आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई - कोरोना संकटामुळे उत्पनाचे आर्थिक स्रोत घटल्याने राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. परिणामी अनेक खर्चाना कात्री लावल्याने विकासकामे खोळंबली आहेत. तर दुसरीकडे सरकारच्या कामांची प्रसिद्धी करण्यासाठी खासगी संस्थांवर कोट्यवधींचा खर्च करण्यात येणार आहे. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खात्याचा यात समावेश असून यासाठी सहा कोटींची तरतूद केली आहे. सविस्तर वाचा..
- हैदराबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था अपुरी ठरत असून; ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिवीरअभावी कित्येक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. देशात सध्या दिवसाला सरासरी चार हजार रुग्णांचा मृत्यू होतो आहे. यामध्येच, गाजावाजा करत केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून दिलेले व्हेंटिलेटर कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. सविस्तर वाचा..
- औरंगाबाद - कोरोना काळात राजकीय नेत्यांचे कोणतेही कार्यक्रम नको, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. कोरोनाची दुसरी लाट भीषण असतानाही अनेक लोकप्रतिनिधी बिनधास्तपणे कार्यक्रम घेऊन गर्दी जमवत आहेत. याची गंभीर दखल घेत, औरंगाबाद खंडपीठाने भूमीपूजन, आंदोलने आणि मोर्चे काढण्यास सध्या थारा नकोच, असे स्पष्ट केले आहे. सविस्तर वाचा..
- अहमदनगर - महाराष्ट्रासह देशावर कोरोनाचे संकट वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाला ओरडून सांगत होते की भारतातील कोरोना गेला म्हणून.. पण झाले काय, आज भारतातील कोरोनाचा संसर्ग जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे नियोजन करण्यात चुकले असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. सविस्तर वाचा..
- बीजिंग : संयुक्त राष्ट्रांनी असा अंदाज वर्तवला होता, की २०२७मध्ये भारत चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरेल. मात्र, चीनने दिलेल्या एका अहवालानुसार हे त्याहूनही आधी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सविस्तर वाचा..
- अहमदनगर - जिल्ह्यातील जामखेड शहरामधील बीड रोडजवळ राहणाऱ्या शिल्पा अजय जाधव (वय 28 वर्षे) या विवाहितेने बुधवारी दुपारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तिचा पती अजय कचरदास जाधव (वय 32 वर्षे) याला समजल्यानंतर त्यानेदेखील दुसऱ्या ठिकाणी काहीवेळातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सविस्तर वाचा..
- बंगळुरू : माध्यमांनी कोरोनाबाबतच्या बातम्या दाखवून लोकांमध्ये भीती पसरवू नये, अशा आशयाची याचिका कर्नाटकच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने 'रिमोट तर तुमच्याच हातात आहे' असे म्हणत या याचिकेला केराची टोपली दाखवली. सविस्तर वाचा..
- मुंबई - आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार राज्यात आज (12 मे) 58 हजार 805 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 46 लाख 196 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सविस्तर वाचा..
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या! - देशातील महत्त्वाच्या बातम्या
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या!

Last Updated : May 13, 2021, 1:04 PM IST