- मुंबई - मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मुंबईकर वाढत्या तापमानाने हैराण झाले आहेत. मुंबईतल्या सांताक्रूझमध्ये आजचे कमाल तापमान 35.3 तर कुलाबा येथे 32.4 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. वातावरण बदल होणे हे सामान्य आहे, थंडीकडून आता उन्हाळ्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे आणि परिसरासह संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागात यंदा उन्हाच्या झळा तीव्र राहण्याची शक्यता असल्याचे मुंबई हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
कोकण किनारपट्टीसह विदर्भ मराठवाड्यात तापमानवाढ होण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
- मुंबई - पाच दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला. राठोड यांनी 28 फेब्रुवारीला आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला होता. मात्र मुख्यमंत्री ठाकरे हे मंत्री संजय राठोड यांचा राजीनाम्यावर सही करत नाहीत, असा आरोप भारतीय जनता पार्टीकडून लावण्यात येत होता. मात्र आज मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला. संजय राठोड यांनी आपला राजीनामा दिला नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराच भाजपाकडून राज्य सरकारला देण्यात आला होता.
राज्यपालांनी स्वीकारला वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा
- मुंबई - महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात नागरिकांना सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या, कोविड सेंटरची निर्मिती केली. चांगले काम करूनही विरोधक सरकारवर चिखलफेक करतात, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल अभिभाषणावर बोलताना व्यक्त केली. तसेच राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या आणि घरगुती गॅसच्या किंमतीवर भाष्य केले. वाढती महागाई केंद्र सरकारने कमी करून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्ती केली. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नावर आणि टीकेवर उपमुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली.
केंद्र सरकारने महागाई कमी करून दिलासा द्यावा - उपमुख्यमंत्री
- मुंबई- आयकर विभागाकडून मुंबई-पुणे याबरोबरच दिल्ली, हैदराबाद या ठिकाणी दिग्दर्शक अनुराग कश्यप , अभिनेत्री तापसी पन्नू , विकास बहल सह विक्रमादित्या मोट्वाने व मधू वर्मा मंटेना यांच्यासह इतर व्यक्तींच्या घर व कार्यालयावर आयकर विभागाकडून छापे मारण्यात आले होते. याच दरम्यान 28 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली असून मोशन पिक्चर्स , फँटम फिल्म, वेबसिरीज व दोन टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी ज्यामध्ये आंदोलन फिल्म्स व क्वाण टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचा समावेश आहे.
अनुराग-तापसी रडारवर; आयकर विभागाकडून २८ ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू
- मुंबई - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना ताकद आजमावून पाहणार, अशी चर्चा सुरू होती. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी, शिवसेना बंगालमध्ये निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केलं आहे.
शिवसेना बंगाल निवडणूक लढवणार नाही, ममता बॅनर्जींना दिला पाठिंबा
- मुंबई - जळगाव शहरातील एका वसतिगृहातील महिलेसोबत पोलिसांनी गैरप्रकार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील महिला वेडसर असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या प्रकरणी सहा महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करण्यात आली होती. या कमिटीने चौकशी दरम्यान वसतिगृहातील १७ महिला साक्षी नोंदवल्या. या कमिटीच्या अहवालात कोणतेही तथ्य नसल्याचे पुढे आले आहे, असेही देशमुख म्हणाले.
जळगाव वसतिगृह प्रकरणातील तक्रारदार महिला वेडसर; गृहमंत्र्यांची माहिती
- मुंबई - आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवण्याचे निर्देश प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ
सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांविरोधात दिला हक्कभंग प्रस्ताव
- मुंबई - सोशल मीडियावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे एका तृतीयपंथीयासोबत अनैतिक संबंध असल्याची पोस्ट व्हायरल करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. गेल्या काही दिवसापासून ही पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती, मात्र आज विधानसभेत राजकीय नेत्यांवर खोट्या पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली गेली पाहिजे, अशी मागणी खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल व्हायरल होत असलेल्या पोस्टविरोधात निषेध व्यक्त केला.
फडणवीसांचे तृतीयपंथीयासोबतच्या पोस्टप्रकरणी कारवाईचे अजित पवारांचे आदेश
- औरंगाबाद - पदमपूरा येथील कोविड सेंटरमध्ये महिला रुग्णाला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉक्टरवर महानगर पालिकेने कारवाई केली आहे. संबंधित डॉक्टर कंत्राटी डॉक्टर असून त्याला बडतर्फ केल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
महिला रुग्णाला शरीरसुखाची मागणी करणारा डॉक्टर बडतर्फ
- अहमदाबाद - चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यांची सुरूवात खराब झाली. पहिल्या सत्रामध्येच इंग्लंडचे तीन फलंदाज बाद झाले. पहिल्यांदा फिरकीपटू अक्षर पटेलने इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडलं. त्यानंतर मोहम्मद सिराजने कर्णधार जो रुटला बाद करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. बेअरस्टो आणि बेन स्टोक्स या जोडीने उपहारापर्यंत नाबाद ४४ धावांची भागिदारी करत पडझड रोखली. इंग्लंडने उपहारापर्यंत ३ बाद ७४ धावा केल्या आहेत.
IND Vs ENG ४th Test १st Day : उपहारापर्यंत इंग्लंड ३ बाद ७४ धावा