ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top ten news stories around the globe
Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...
author img

By

Published : Feb 12, 2021, 3:19 PM IST

Updated : Feb 12, 2021, 10:58 PM IST

  • मुंबई - नाना पटोले यांनी 4 फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. नाना पटोले यांची कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज (१२ फेब्रुवारी) त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीने कॉंग्रेसला राज्यात बळ मिळणार असून पक्षसंघटना मजबूत होईल, असा विश्वास अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, जाणून घ्या राजकीय कारकीर्द

  • मुंबई - महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी नगरीत जेजुरी गडावर श्री मार्तंड देव संस्थांनच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण १३ फेब्रुवारी रोजी माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वीच शुक्रवारी पहाटेच भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी गडावर कार्यकर्त्यांसह जाऊन पुतळ्याचे अनौपचारिक अनावरण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली. दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी चौफेर टिका केली आहे.

गोपीचंद पडळकरांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौफेर टिका

  • बारामती - शासनाने कृषीपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी आणलेल्या ‘कृषीपंप धोरण-२०२०’ अंतर्गत कृषी योजनेची अंमलबजावणी राज्यात सर्वत्र सुरु आहे. कडेगाव विभागातील १९३ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी तब्बल ८२ लाख २२ हजार रुपये एकरकमी भरुन वीजबिल कोरे करण्याची संधी पटकावली आहे. परिणामी कृषी वसुलीत राज्यात अग्रेसर असलेल्या बारामती परिमंडलाने ५० कोट्टींचा टप्पा गाठला आहे. एकीकडे वाढीव वीजबिलामुळे ग्राहकांनी बिले भरण्यास नकार दिला असताना व विरोधी पक्षांनी या मुद्यावर रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले असताना बारामती परिमंडळाची बिल वसुली कौतुकास्पद आहे.

१९३ शेतकऱ्यांनी एकरकमी भरले ‍८२ लाखाचे वीजबिल.. बारामती परिमंडलाने गाठला ५० कोट्टींचा टप्पा

  • नवी दिल्ली- देशभरात ७० लाख जणांकडे १ अब्ज डॉलरचे क्रिप्टोचलन आहे. यामध्ये वर्षभरात ७०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा क्रिप्टोचलनाबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्तवाचे विधेयक सादर करण्यात येणार आहे. या विधेयकाच्या निमित्ताने क्रिप्टोचलनाबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.

जाणून घ्या, क्रिप्टोचलनाबाबत इत्यंभूत माहिती

  • मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कित्येक महिन्यांपासून बंद असलेली विद्यालये, महाविद्यालये येत्या १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. शारीरिक अंतर ठेवणे, मास्क लावणे आदी कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबरोबरच ५० टक्के उपस्थितीची मर्यादा घातली आहे. यासंदर्भातील परिपत्रक उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे.

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून होणार सुरू, सरकारकडून नवीन नियमावली जारी

  • मुंबई - नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली आहेत. विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर नागपूरमध्ये त्यांचे जंगी स्वागत झाल्याचे पाहायला मिळाले होते. काल मुंबईत त्यांनी पत्रकारांशी बातचीत करुन काँग्रेसच्या उभारणीसाठी कार्यरत होणार असल्याचे सांगितले होते.

नाना पटोले यांनी स्वीकारला काँग्रेस अध्यपदाचा पदभार

  • पुणे - महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी नगरीत जेजुरी गडावर श्री मार्तंड देव संस्थांनच्या वतीने उभारण्यात आलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण १३ फेब्रुवारी रोजी माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वीच शुक्रवारी पहाटेच भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी गडावर कार्यकर्त्यांसह जाऊन पुतळ्याचे अनौपचारिक अनावरण करण्याचा प्रयत्न केला आहे.

अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनधिकृतपणे अनावरण करणाऱ्या पडळकरांविरोधात तक्रार

  • मुंबई- आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना ईडीच्या विशेष न्यायालयाने अंशत: दिलासा दिला आहे. चंदा कोचर यांना विशेष न्यायालयाने पाच लाखांचा जामीन मंजूर केलेला आहे. नियमबाह्य पद्धतीने व्हिडीओकॉन ग्रुपला हजारो कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचा कोचर यांच्यावर आरोप आहे. मनी लाड्रिंगच्या प्रकरणातही ईडीकडून तपास केला जात आहे.

चंदा कोचर यांना ईडी विशेष न्यायालयाकडून पाच लाखांचा जामीन मंजूर

  • जळगाव - भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात येऊन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपला ललकारले आहे. 'सीडी' लावण्याबाबत मी गंमतीने बोललो होतो. त्यांनी आता खरंच माझ्या मागे ईडी लावली आहे. माझे सीडी लावण्याचे काम अजून बाकी आहे, असा इशारा एकनाथ खडसे यांनी भाजपला दिला.

'माझ्यामागे ईडी लावली, सीडी लावण्याचे काम अजून बाकी आहे' एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा

  • चमोली - उत्तराखंडमधील जोशीमठ येथील हिमस्खलन होऊन सहा दिवस झाले असून अद्यापही बचावकार्य सुरू आहे. हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार ३६ जणांचे मृतदेह सापडले असून अजूनही २०६ जण बेपत्ता आहे. तपोवन आणि ऋषीगंगा उर्जा प्रकल्पातील बोगद्यातून चिखल, माती काढण्याचे काम सुरू असून बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत.

उत्तराखंड हिमस्खलन: सहाव्या दिवशीही बचावकार्य सुरू; ३६ मृतदेह सापडले २०६ बेपत्ता

Last Updated : Feb 12, 2021, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.