- रायगड - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दोषी असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्यासह दोन जणांवर रायगड पोलिसांनी जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी याच्या न्यायालयात आज (शुक्रवारी) दोषारोप पत्र दाखल केले. आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि आत्महत्येस संधी दिल्याचा आरोप या दोषारोप पत्रात दाखल केला आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामींसह नितेश सरडा, दिरोज शेखच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सविस्तर वाचा- अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : अर्णब गोस्वामींवर दोषारोप पत्र दाखल
- मुंबई - राज्यात आज (शुक्रवारी) ५,२२९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,४२,५८७ वर पोहोचला आहे. तर याबरोबरच राज्यात आज १२७ कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत एकूण ४७,५९९ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ८३,८५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा- महाराष्ट्र कोरोना अपडेट : ५,२२९ नवीन रुग्णांचे निदान, १२७ रुग्णांचा मृत्यू
- अमरावती - अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत वाशीमचे किरण सरनाईक यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत जाणकारांचे सर्व अंदाज चुकले असून मतदानाच्या दिवशीपर्यंत किरण सरनाईक हे स्पर्धेत राहतील, अशी अपेक्षाही कुणाला नसताना अतिशय नियोजनबद्ध आखणी करून किरण सरनाईक यांनी महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांचा 3 हजार 342 मतांनी पराभव करून सर्वांना चकित केले आहे.
सविस्तर वाचा- अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक: किरण सरनाईक यांनी मारली बाजी
- मुंबई - विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसघांतील पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. पदवीधर मतदारसंघातील पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या तिन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार आघाडीवर असून अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार जिंकण्याच्या मार्गावर आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी एकत्रित लढत दिल्याने भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. गेल्या ५८ वर्षांपासून भाजपने राखलेल्या नागपूरच्या गडाला अखेर महाविकास आघाडीने खिंडार पाडले आहे.
सविस्तर वाचा- विधान परिषद निवडणूक : ५८ वर्षांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला नागपुरात खिंडार, पुण्याचाही गड केला काबिज
- नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आज (शुक्रवार) दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. कृषी कायदे रद्द करण्याच्या आमची मागणी असून त्याशिवाय दुसरी चर्चा सरकारबरोबर होणार नाही, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. उद्या देशभरात पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार, केंद्रीय नेते आणि बड्या उद्योगपतींच्या प्रतिमेचे दहन करणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
सविस्तर वाचा- शेतकरी आंदोलन : देशभरात पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेचे दहन करणार
- नागपूर - नागपूर पदवीधर निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी दमदार विजय मिळवला आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत त्यांनी विजयासाठीचा आवश्यक कोटा पूर्ण करत भाजपाच्या संदीप जोशींचा पराभव केला आहे. नागपूरच्या राजकारणात आपले भविष्य आजमावतांना अनेक वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, पदवीधरांचे आमदार झालेल्या अभिजित वंजारी यांनी भारतीय जनता पक्षाचा गड उद्धवस्त करत इतिहास रचला आहे.
सविस्तर वाचा- नागपूर पदवीधर निवडणूक: मतदार नोंदणीत आघाडी घेतल्यानेच माझा विजय- अभिजित वंजारी
- पुणे - देशाचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे सातत्याची कमतरता असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. पुण्यातील एका आयोजित कार्यक्रमात याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार बोलत होते. मात्र, त्यांनी बराक ओबामा यांनी राहुल यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याला बगल दिली.
सविस्तर वाचा- राहुल यांच्याकडे सातत्याची कमी; शरद पवारांनी व्यक्त केले मत
- पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निकाल म्हणजे महाविकास आघाडी, आणि आम्ही वर्षभरात केलेले काम याची पोचपावती असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. या निकालांमुळे सत्तेत येण्याचा भाजपचा दावा फोल ठरल्याचेही ते म्हणाले.
सविस्तर वाचा- विधानपरिषद रणधुमाळी : पुणे पदवीधरमध्ये मविआ कडून भाजपचा धुव्वा! राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी; पाहा LIVE अपडेट्स..
- नागपूर - नागपूर पदवीधर निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी दमदार विजय मिळवला आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत त्यांनी विजयासाठीचा आवश्यक कोटा पूर्ण करत भाजपाच्या संदीप जोशींचा पराभव केला आहे. अभिजित वंजारी हे विजयी प्रमाणपत्र घेण्यासाठी मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहे.
सविस्तर वाचा- ५८ वर्षांनी भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार : नागपुरात काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारींचा दमदार विजय
- मुंबई - विधान परिषद निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्हाला पराभव मान्य असून, त्याचे नक्कीच आत्मपरिक्षण करू. मात्र, खरे आत्मपरिक्षण करण्याची गरज मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेला आहे,' असे फडणवीस म्हणाले आहेत. महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा झाला. मात्र, शिवसेनेला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
सविस्तर वाचा- विधान परिषद निवडणूक: आम्ही आत्मपरिक्षण करूच, मुख्यमंत्र्यांनीही करावे; फडणवीसांचा ठाकरेंना सल्ला