कांदिवलीतील १५ मजली इमारतीला भीषण आग, दोन रहिवाशांचा मृत्यू
कांदिवली पश्चिम येथील मथुरादास मार्गावरील हंसा हेरिटेज भागातील गोल्ड शॉप इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर शनिवारी रात्री लागलेल्या आगीत दोनजण जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. रात्री साडेदहा वाजेपर्यंत आठ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीतील दोन जखमी झालेल्या रहिवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; रवानगी आर्थर रोड कारागृहात
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर त्यांना आता आर्थर रोड कारागृहात आणण्यात आले आहे.
पंजाब काँग्रेसमधील धुसफूस कायम, माजी आमदाराचा कॅबिनेट मंत्र्यावर गंभीर आरोप
पंजाब काँग्रेसमधील वाद काही संपण्याचे नाव घेत नाही. नुकतेच नवज्योत सिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा वाद सर्वांनी पाहिला. त्यानंतर कायम धुसफूस सुरूच आहे. आता काँग्रेसचे माजी आमदार अश्वनी सेखडी यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री तृप्त राजिंदर सिंह बाजवा यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मंत्री बाजवा काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप सेखरी यांनी केला आहे.
नगरच्या जिल्हा रुग्णालयात भीषण आगीत 11 जण दगावले, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आज सकाळी अकराच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये या ठिकाणी असलेल्या सतरा रुग्णांपैकी यातील किमान 11 रुग्ण हे दगावले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जिल्हाधिकारी डॉ भोसले यांनी दहा मृत्यू झाल्याला पुष्टी दिली आहे. पण हा आकडा वाढण्याची भीती आहे. सूत्रांच्या माहिती नुसार 11 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या आयसीयू वार्डात 17 कोरोना रुग्ण होते.
नबाब मलिकांच्या आरोपाला समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर.. अनेक आरोपांचे खंडन
गेल्या महिन्याभरापासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून राज्यातील आणि विशेषत: मुंबईतलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. समीर वानखेडेंनी कॉर्डेलिया क्रूजवर छापा टाकून आर्यन खानसह ८ आरोपींना अटक केली. पण तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सातत्याने समीर वानखेडे आणि एनसीबीवर टीका केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा या प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक आज पत्रकार परिषद घेणार आहे.
गेली बऱयाच दिवसांपासून मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर सर्वत्र हाच विषय आहे.
सहा प्रकरणांचा तपास सुरू, एसआयटीने मुंबई एनसीबीकडून कागदपत्रे घेतली ताब्यात
आर्यन खान ड्रग प्रकरणामध्ये एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप करण्यात आले होते. यानंतर मुंबईतील 6 स्पेशल केसचा तपास स्थापन केलेली दिल्लीतील एनसीबीची एसआयटी टीम करणार आहे. संजय सिंग यांच्या नेतृत्वात ही एसआयटी तपास करणार आहे.