आज 'या' बातम्यांवर असेल नजर -
धार्मिक स्थळे आजपासून होणार खुली
मुंबईसह राज्यात कोरोनाचा वेग मंदावताना सरकारने निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. नवरात्रोत्सवापासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, को रोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक असेल. सरकारने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर तसेच इतर उपाययोजना अनिवार्य असणार आहेत.
सात ऑक्टोबरपर्यंत आर्यनसह आठ जणांना कोठडी
अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्जप्रकरणी कोर्टानं 7 ऑक्टोबरपर्यंत NCB ची कोठडी सुनावली आहे. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डिया द क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई करत १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस आणि २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त केले आहे. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा या आठ जणांना ताब्यात घेतले आहे. या आठ जणांची एनसीबीकडून कसून चौकशी केली जात आहे.
पंतप्रधान मोदी पोहोचणार उत्तराखंडला
यंदाच्या 7 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी घटनात्मक पदावर बसण्याच्या घटनेला 20 वर्ष पूर्ण होत आहे. याचनिमित्ताने पंतप्रधान मोदी देवभूमी उत्तराखंडला भेट देणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, मोदी 7 ऑक्टोबरला उत्तराखंडच्या जॉली ग्रांड विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत. याशिवाय ऋषिकेश इथल्या एम्स रुग्णालयातल्या ऑक्सिजन प्लांटचेही उद्घाटन करणार आहेत. केदारनाथ चरणी पंतप्रधान मोदी लीन होऊन महादेवाचा आशीर्वाद घेणार आहेत.
फ्लिपकार्टपासून आजपासून सुरू होणार सेल
Flipkart Big Billion Day सेल ७ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. फ्लिपकार्टच्या काही सुपर ब्रँड्सवर स्पेशल डिस्काउंट मिळेल. यात Realme Dizo, Boat आणि इंटेल लॅपटॉप्सवर ४० ते ८० टक्के डिस्काउंट दिले जाणार आहे. फ्लिपकार्टवर Axis बँक आणि ICICI बँकेच्या कार्डवर १० टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे.
कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिर खुले होणार
महिषासुरमर्दिनी, आदिशक्ती दुर्गेची उपासना करणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिरातील तयारी पूर्ण झाली आहे. ही मंदिरे भाविकांना दर्शनासाठी सज्ज झाली आहेत. अंबाबाई मंदिर परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. आजपासून (७ ऑक्टोबर) नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. भाविकांसाठी ऑनलाईन पासद्वारे दर्शनाची सोय करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी नियम पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यात पुढील दोन दिवस विजाच्या कडकडाटासह मुसळधार
राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या पुणे खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. मागील मंगळवारी कोकण, मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला आहे.
लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ येत्या 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आणि केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांवरील दडपशाही विरोधात ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता, सर्वांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्षही सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे, दुग्धमंत्री सुनील केदार यावेळी उपस्थित होते.
कालच्या महत्त्वाच्या बातम्या-
- लखमीपूर खेरी (लखनौ) - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे बहीण प्रियंका गांधी यांच्यासमवेत अखेर आज लखमीपूर गावात पोहोचले. यावेळी त्यांनी जीपने चिरडून ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. उत्तर प्रदेशमधील लखमीपूर जिल्ह्यातील तिकूनिया गावाजवळ झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने लखमीपूरमध्ये संतप्त वातावरण आहे.
- नवी दिल्ली : यावर्षी जुन्याच पद्धतीनुसार नीट परीक्षा घेतली जाणार आहे. केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा मंडळाने सर्वोच्च न्यायालयात याविषयीची माहिती दिली आहे. नीटसाठीची नवीन पद्धत पुढील वर्षीपासून लागू केली जाणार आहे. यंदाची NEET SS परीक्षा ही जुन्या पद्धतीनुसारच घेतली जाणार आहे. परीक्षेसाठीची नवी पद्धत पुढील वर्षीपासून लागू होईल असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा पुढे ढकलली जाईल असे मंडळाने म्हटले होते. ही परीक्षा आता नोव्हेंबर ऐवजी जानेवारीत होणार आहे.
सविस्तर वाचा-नीटचे टेन्शन मिटले! यंदा जुन्याच पद्धतीनुसार होणार परीक्षा!
- नवी दिल्ली : फेसबूक, व्हाटसअॅपनंतर आता जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याच्या तक्रारी विविध युझर्स करत आहेत. जिओचे नेटवर्क काम करत नसल्याच्या तक्रारी अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावरून केल्या आहेत. तर जिओने वापरकर्त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल क्षमा मागत लवकरच ही समस्या लवकरच सोडविली जाईल असे म्हटले आहे.
सविस्तर वाचा जिओचे नेटवर्क डाऊन! वापरकर्त्यांच्या तक्रारीनंतर जिओने दिले हे स्पष्टीकरण
- मुंबई - गारपीट व अवेळी पावसामुळे मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे फळपिकांचे नुकसान झाले. गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने शेतपिकाच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱयांना मदतीचे वाटप करण्यासाठी १२२कोटी २६ लाख ३० हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी १२२ कोटी रुपयांचा निधी मंजूर
- मुंबई - कार्डिया क्रुझवरील ड्रग्स पार्टीची कारवाई बोगस आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंटला पकडणारे अधिकारी हे एनसीबीचे नसून, ते भाजपाचे पदाधिकारी असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. या आरोपात तथ्य नसल्याचा एनसीबीने खुलास करत क्रूझवर केलेली कारवाई नियमानुसार केली आहे. तसेच या कारवाईत आर्यन खानसह आठ आरोपींना ड्रग्ससहित ताब्यात घेतले. के. पी. गोसावी आणि मनीष भानुशाली यांच्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती एनसीबीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
सविस्तर वाचा- होय... गोसावी-भानुशालीच्या माहितीच्या आधावरच क्रूझवर केली कारवाई, एनसीबीचा खुलासा
जाणून घ्या आजचे राशीभविष्य-
7 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज वाणीवर संयम ठेवावा लागेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
VIDEO : 7 ऑक्टोबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य