ETV Bharat / bharat

Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या ठळक बातम्या! - आसाम विधानसभा निवडणूक २०२१

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @ 7 PM
Top 10 @ 7 PM
author img

By

Published : Mar 2, 2021, 7:01 AM IST

Updated : Mar 2, 2021, 7:40 PM IST

  • मुंबई - पेट्रोलच्या दरवाढीच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे. राज्याचे विविध प्रकारचे कर असतात. ते कर वाढले, तर इंधनाचे दर वाढतात. तसेच गुजरात, कर्नाटक या राज्यात आपल्यापेक्षा पेट्रोल स्वस्त आहे. केंद्र या राज्यांना स्वस्त आणि आपल्याला महाग पेट्रोल देते, असे होत नाही, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

सविस्तर वाचा- LIVE UPDATE : अर्थसंकल्पीय अधिवेशन; राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला सुरूवात

  • अमरावती - जिल्ह्यात १० दिवसांपूर्वी लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ आली आहे. तसेच शहरात फर्जी कोरोना टेस्ट लॅब सुरू केल्या आहेत. यात मोठा काळाबाजार आहे. प्रत्येक बेडमागे १० हजार रुपये घेण्यात येत असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. तसेच सरकारने स्वत:चे अपयश लपवण्यासाठी लॉकडाऊन लावला असून त्यामुळे अमरावतीचे नाव बदनाम होते आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन हटवावे, अशी आमदार राणा यांनी विधानसभेत मागणी केली आहे.

सविस्तर वाचा- CORONA UPDATE : सोमवारी राज्यात 6397 रुग्णांची नोंद; 30 रुग्णांचा मृत्यू

  • मुंबई - टीआरपी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी बीएआरसीचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दासगुप्ता यांना २ लाख रुपयांच्या बाँडवर आणि अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन शर्तीचा एक भाग म्हणून दासगुप्ता यांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत सहा महिन्यांसाठी हजेरी देणे आवश्यक असेल.

सविस्तर वाचा- टीआरपी घोटाळा : पार्थो दासगुप्ता यांना जामीन मंजूर

  • वाशिम - पूजा चव्हाण हीच्या कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी मानोरा पोलीस ठाण्यात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चित्र वाघ, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, शांताबाई चव्हाण यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रीय बंजारा परिषदचे युवा जिल्हा अध्यक्ष श्याम राठोड यांनी या संदर्भात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता तक्रार दाखल करून घेतली. परंतु आता ती तक्रार मागे घेण्यात आली आहे. आधीच वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर वाशिम पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. आता पोलिसांकडून अजून एक चूक झाल्याचे दिसून येत आहे. मानोरा पोलिसांनी दिलेल्या अर्जाची तपास न करता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून ते रद्द करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा- पूजा चव्हाण प्रकरण: फडणवीसांसह भाजपच्या या नेत्यांविरुद्ध दाखल तक्रार मागे

  • मुंबई - 12 ऑक्टोबर 2020 यादिवशी लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अचानक वीज गेल्याने सगळ्यांची तारांबळ उडाली होती. मात्र, या ब्लॅक आउटमागे विशेष सायबर हल्ला झाल्याची शक्यता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वर्तवली आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सविस्तर वाचा- मुंबईच्या ब्लॅक आऊटमागे चिनी सायबर हल्ला -अनिल देशमुख

  • मुंबई - उत्तम रोगप्रतिकारक शक्ती हेच कोरोनाला रोखण्याचे प्रमुख शस्त्र असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांचा कल रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्‍या उत्पादनांकडे वाढू लागला. आयुर्वेदिक काढ्यांनी रोगप्रतिकारक शक्ती वेगाने वाढण्यास मदत होत असल्याचे स्पष्ट झाल्याने लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच काढ्याचे सेवन करू लागले. यातूनच भारतीय मसाल्यांचे महत्त्व अधोरेखित होऊन त्यांच्या मागणीत वाढ झाली. भारतीय मसाल्यांची ही जादू जागतिक स्तरावरही पसरली असून, जगभरातूनही भारतीय मसाल्यांच्या मागणीत वाढ झाली आहे.
    सविस्तर वाचा- कोरोनावर भारतीय मसाले गुणकारी, 'या' मसाल्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात वाढली मागणी
  • कानपुर देहात (उत्तर प्रदेश ) - भोगनीपूर पोलीस स्टेशन क्षेत्रातील मऊ मुगलपूर रोडवर ट्रॉली पलटल्याने ६ मजूरांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात ओव्हरलोडिंगमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सविस्तर वाचा- उत्तर प्रदेश : ट्रॉली पलटल्याने ६ मजूरांचा जागीच मृत्यू, ८ गंभीर

  • मुंबई - फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गेली अनेक दशके भारतीय चित्रपटसृष्टीत मानाने स्थान पटकावून आहे. त्याला भारताचा ‘ऑस्कर’ म्हणूनसुद्धा संबोधिले जाते. प्रत्येक कलाकाराचे, पडद्यावरील वा पडद्यामागील, स्वप्न असते हा पुरस्कार मिळविण्याचे. गेल्या पाच वर्षांपासून फिल्मफेअरने खास मराठी चित्रपटसृष्टीसाठी फिल्मफेअर पुरस्कार मराठी सुरु केले व हल्लीच, मीडिया आणि प्रेक्षकाविना, हा सोहळा पार पडला. पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचालन अमेय वाघ, सिध्दार्थ जाधव आणि मोनिका मुर्ती यांनी केले. त्यांनी आपल्या खास विनोदी आणि मनमोकळ्या शैलीत प्रेक्षकांना मनुमुराद हसवत सोहळा संस्मरणीय बनविला.

सविस्तर वाचा- फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२०मध्ये परिणीती चोप्राची आकर्षक व खास उपस्थिती!

  • मुंबई - कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर म्हणून पोलीस विभागासह आणि इतर महत्त्वाच्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्याचा कार्यक्रम नियमीत सुरू आहे. कालपासून (ता १ सोमवार) तिसऱ्या टप्यातील लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. यात जेष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरिल व्याधीग्रस्त अशा लोकांना लस दिली जात आहे. आज भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी लस घेतली. त्यांनी लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

सविस्तर वाचा- भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी घेतली कोरोना लस; दिली 'ही' प्रतिक्रिया

Last Updated : Mar 2, 2021, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.