आज 'या' बातम्यांवर असेल नजर -
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक
- अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या पार्थिवावर आज प्रयागराजमध्ये अंत्यविधी करण्यात येणार आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ही उपस्थित राहणार आहेत.
- IPL 2021 च्या सत्रातील आज 33 वा सामाना दिल्ली कॅपिटल विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, असा होणार आहे. सामन्याची सुरुवात सांयकाळी साडेसात वाजता होईल.
- कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जंयती आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 'रयत शिक्षण संस्थे'ची स्थापन केली. या संस्थेद्वारे त्यांनी शिक्षण प्रसाराचे काम सुरू केले. गरिब व गरजु मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी 'कमवा व शिका'ही योजना सुरू केली. भारतीय स्वातंत्र लढ्यातही त्यांचा सहभाग होता.
कालच्या महत्त्वाच्या बातम्या -
- मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी(20 सप्टेंबर) २५८३ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यात मंगळवारी (२१ सप्टेंबर) किंचित वाढ होऊन ३१३१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७० रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. मंगळवारी ४०२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - राज्यात सध्यातरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. मात्र, मुंबईसारख्या शहरात नागरिकांमध्ये ८६ टक्के अँटिबॉडीज निर्माण झाल्या आहेत. तसेच, लसीकरण झाल्याने तिसरी लाट येईल आणि जाईल, ही लाट दुसऱ्या लाटेइतकी तीव्र नसेल, अशी माहिती डॉक्टरांसाठी कार्यरत असलेल्या मेडस्केप इंडिया संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुनीता दुबे यांनी दिली. तर, पावसाळा व गणेशोत्सवानंतर मुंबईत येणाऱ्या नागरिकांच्या संपर्कात येऊन मुंबईत रुग्णसंख्या वाढू शकते, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. सविस्तर वाचा ...
- मुंबई - भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करून महाविकास आघाडी सरकारला जेरीस आणणाऱ्या किरीट सोमैया यांच्या विरोधात शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब यांनी १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा उच्च न्यायालयात दाखल केला आहे. ७२ तासांत सोमैया यांनी माफी मागण्याचा अल्टीमेंटम परब यांनी दिला होता. सोमैया यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने न्यायालयात धाव घेतल्याची माहिती परब यांनी ट्विट करून दिली आहे. सविस्तर वाचा ...
- मुंबई - राज्यातील महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी विरोधकांची मागणी आहे. राज्यपालांनी त्यांच्या सुरात सूर मिसळणे संसदीय लोकशाहीला मारक असल्याचे सडेतोड उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवलेल्या पत्रातून दिले आहे. सविस्तर वाचा ...
- हिंगोली - संपूर्ण राज्यात गणेश विसर्जनाच्या गर्दीनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी हिंगोलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. सविस्तर वाचा ...
जाणून घ्या आजचे राशीभविष्य -
- 22 सप्टेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
- VIDEO : 22 सप्टेंबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
आजची प्रेरणा : दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा