आज 'या' बातम्यांवर असेल नजर -
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज दि. 20 आणि उद्या दि. 21 सप्टेंबर रोजी गोवा दौऱ्यावर असणार आहे.
- कोल्हापुरात आजपासून दोन दिवस 20 आणि 21 सप्टेंबर रोजी कलम 144 लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
- सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान अल सौद हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
- IPL 2021 च्या दुसऱ्या सत्राला सुरूवात झाली असून आज कोलकाता नाइट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सामना सायंकाळी 7:30 वाजता होणार आहे.
- पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची आज कॉंगेस नेते चरणजीत सिंह चन्नी हे शपथ घेणार आहेत.
कालच्या महत्त्वाच्या बातम्या -
- सातारा - भाजप नेते किरीट सोमैय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमैय्या आज कोल्हापूरला भेट देणार होते. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - गणेश विसर्जनाला समुद्रात जाऊ नका असे आवाहन पालिकेने केले होते त्यानंतरही वर्सोवा जेटी येथील समुद्रात 5 मुले रात्री 9 च्या सुमारास गणेश विसर्जनदरम्यान गेली होती. ही सर्व मुले समुद्रात बुडाली असता स्थानिक नागरिकांनी 2 मुलांना वाचवून रुग्णालयात दाखल केले आहे. इतर 3 जणांचा शोध अद्याप लागला नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. सविस्तर वाचा...
- कोल्हापूर - किरीट सोमैया यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नोटीस दिली आहे. नोटीसमध्ये सर्व पोलीस बंदोबस्त गणेश विसर्जनात व्यस्त राहणार असल्याने सोमैया यांच्या दौऱ्यासाठी बंदोबस्त पुरवायला असमर्थता दर्शवली आहे. त्यानंतरही भाजपा नेते किरीट सोमैय्या हे मुंबईहून कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. मात्र सोमैय्या यांच्या विरोधासाठी कोल्हापुरातल्या रेल्वे स्टेशन बाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आतापासून जमायला सुरुवात झाली आहे, त्यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी सुरू आहे. शिवाय सोमैय्या यांचे पायताण घेऊन स्वागत करण्याचा इशारा सुद्धा कार्यकर्त्यांनी दिला आहे. सविस्तर वाचा...
- दुबई - आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राला सुरूवात झाली आहे. दुसऱ्या सत्रातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऋतुराज गायकवाडच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 157 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करत असतांना मुंबई इंडियन्स 20 ओवरमध्ये आठ विकेटवर 136 धावा बनवू शकली. चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सची दमछाक करत 20 धावांच्या फरकाने पराभव केला. या विजयाने चेन्नईने गुणतालिकेत १२ गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे. सविस्तर वाचा...
- राजनांदगाव : छत्तीसगडमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजिंदरपाल सिंह भाटिया यांनी आत्महत्या केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजिंदरपाल सिंह यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. सविस्तर वाचा...
जाणून घ्या आजचे राशीभविष्य -