ETV Bharat / bharat

आज अनंत चतुर्दशी, राज्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त; वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर - चेन्नई वि. मुंबई

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Todays Top News
आज अनंत चतुर्दशी, राज्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त; वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर
author img

By

Published : Sep 19, 2021, 6:10 AM IST

आज 'या' बातम्यांवर असेल नजर -

  • आज अनंत चतुर्दशी, राज्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त
  • लातूरात गणेश विसर्जन मिरवणूकीवर बंदी
  • सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान अल सौद दिल्लीत दाखल झाले आहेत. सौदीचे परराष्ट्र मंत्री आज परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत.
  • आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राला आज (19 सप्टेंबर) पासून सुरूवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्सचा सामना आज सायंकाळी 7:30 वाजता होणार आहे.
  • गोव्यात 'सरकार तुमच्या दारी' ही योजना सुरू होणार, सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे काम ही योजना करणार आहे.

कालच्या महत्त्वाच्या बातम्या -

  • चंदीगड - कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा नवज्योतसिंग सिद्धू यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. पुढील मुख्यमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांची नियुक्ती करण्याच्या कोणत्याही सूचनेला विरोध करणार असल्याचे अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट सांगितले. सविस्तर वाचा...
  • नाशिक - सातपूर एमआयडीसीतील एका कंपनीत अचानक स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत सहा कामगार भाजल्याची घटना घडली आहे. अद्याप जखमींची नावे समजू शकलेली नाही. जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सविस्तर वाचा...
  • मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अलिकडच्या काळातील राजकीय वक्तव्यांचा समाचार घेतला. नेत्यांच्या बेताल वक्तव्यांवर त्यांनी आज भाष्य केले. तसेच एकप्रकारे नाराजी व्यक्त केली. राज्याच्या हितासाठी पूर्वी अनेकदा वाद झाले. त्यावेळी सुसंवाद असायचा, आता कोथळा काढण्याची भाषा केली जाते, अशा शब्दांत शरद पवार यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या राजकीय नेत्यांची कान उघडणी केली. मुंबईतील गोरेगाव येथील मृणालताई गोरे दालनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलते होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षस्थानी बाबा आढाव यांची उपस्थिती होती. सविस्तर वाचा...
  • लातेहार (झारखंड) - बालूमाथ पोलीस ठाणे क्षेत्रातील मननडीह गावात मन हेलावून सोडणारी घटना घडली. करमा पूजेनंतर करम डाली विसर्जन करण्यासाठी गेलेल्या 7 मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा...
  • मुंबई - फिल्म इंडस्ट्रीमधील नवोदित कलाकारांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत अश्लील चित्रफिती बनवल्या जात होत्या. या पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्राच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. त्यानंतर आता मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने राज कुंद्राविरोधात पीएमएलए केस दाखल केली आहे. अश्लील चित्रफितीची विक्री करून त्याद्वारे मिळवलेला पैसा कुंद्रा यांनी लंडनमधील एका Llyod बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे राज कुंद्राच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सविस्तर वाचा...

जाणून घ्या आजचे राशीभविष्य -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.