ETV Bharat / bharat

दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विधानभवनात कार्यक्रम; वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर - Late Gulabrao Patil birth centenary year

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

todays top news
दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विधानभवनात कार्यक्रम; वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर
author img

By

Published : Sep 16, 2021, 5:53 AM IST

आज 'या' बातम्यांवर असेल नजर -

  • सहकारतपस्वी दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘शताब्दी एका विचाराची कर्तृत्वाची’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात आज (गुरुवार) दुपारी ३.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.
  • नांदेड जिल्ह्यात आज (16 सप्टेंबर) पासून 30 सप्टेंबर 2021 पर्यंत जमावबंदीचा आदेश लागू होणार आहे, अशी माहिती अप्पर जिल्हादंडाधिकारी दिली आहे.
  • गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज (गुरूवार) दुपारी दीड वाजता राजभवन, गांधीनगर येथे होणार आहे.
  • आज जागतिक ओझोन थर संरक्षण दिन.
  • सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचा यवतमाळ जिल्ह्यात दौरा आहे. या दौऱ्याच्या दरम्यान ते विडुळ मतदारसंघातील विविध विकास कांमाचे भूमिपूजन व लोकार्पण करणार आहेत.

कालच्या महत्त्वाच्या बातम्या -

  • मुंबई - ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडणार नाही. तामिळनाडू आणि इतर राज्यांच्या धर्तीवर हे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भुजबळ म्हणाले. न्यायालयात आव्हान दिले तर अध्यादेश टिकेल, असेही त्यांनी सांगितले. सविस्तर वाचा.
  • मुंबई - पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. पोलिसांनी या प्रकरणी तब्बल दीड हजार पानांचे पुरवणी दोषारोप पत्र न्याायलायत सादर केले आहेत. पूर्वीचे व आताचे मिळून एकूण 4 हजार 996 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. सविस्तर वाचा...
  • मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी रुग्णसंख्या घटून २,७४० रुग्ण आढळून आले होते तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. काल मंगळवारी त्यात वाढ होऊन ३५३० नवे रुग्ण आढळून आले होते. आज बुधवारी त्यात काही प्रमाणात वाढ होऊन ३७८३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४,३६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सविस्तर वाचा...
  • ठाणे - भिवंडी-वाडा राष्ट्रीय मार्गाची खूपच दैनी अवस्था झाली असून या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्याची थातुरमातुर मलमपट्टी केलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांना तलावांचे स्वरूप आले आहे. रस्ते प्रशासनाने आणि टोलवसुली करणाऱ्या कंपनीने खड्डे दुरुस्ती न केल्याच्या निषेधार्थ सरकराचे लक्ष वेधण्यासाठी स्पीड बोट व जॅकेट घालून खड्यात बोट चालवून काही तरुणांचे अनोखे आंदोलन केले आहे. सविस्तर वाचा...
  • पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तब्बल 8 वर्षानंतर पाच आरोपींविरुद्ध बुधवारी (दि. 15 सप्टेंबर) पुणे सत्र न्यायालयात दोषारोप निश्चित करण्यात आले आहे. पाचपैकी चार आरोपींविरुद्ध युएपीए कायद्यानुसार खटला चालविण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यावरुन त्यांच्यावर हत्या, हत्येचा कट रचने, असे आरोप निश्चित करण्यात आले आहे. सविस्तर वाचा...
  • मुंबई - आयकर विभागाने बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबई येथील कार्यालयाचे सर्वेक्षण केले. आयकर विभागाचे अधिकारी सोनू सूदच्या घरी देखील पोहोचले, मात्र विभागाच्या या कृत्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सविस्तर वाचा...

जाणून घ्या आजचे राशीभविष्य -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.