आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.
आजच्या महत्त्वाच्या बातम्या -
- डोंबिवली औद्योगिक परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आज (गुरुवार) रोजी शिवसेना नेते तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या व पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते संपन्न होणर आहे. यावेळी ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
- आमदार रोहित पवार यांचा आज कर्जत दौरा
- खासदार डॉ. प्रितम मुंडे यांचा आज जन्मदिन आहे. त्यानिमित्त मतदार संघात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कालच्या महत्त्वाच्या बातम्या -
- लखनऊ ( उत्तरप्रदेश) - उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये बुधवारी संध्याकाळी उशिरा एक मोठी दुर्घटना ( Big Incident in UP) घडली आहे. माहितीनुसार लग्नसमारंभातील हळदी समारंभात अनेक मुली आणि महिला विहिरीत पडल्याचे सांगण्यात ( uttar pradesh several people fell in well ) येत आहे. यामध्ये काही मुलींसह 11 जणींचा जागीच मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हळदी समारंभात सर्वजण विहिरीच्या जाळीवर बसून पूजा करत होते, तेव्हा जाळी तुटल्याने सर्वजण त्यात पडले. ही घटना नेबुआ नौरंगिया पोलीस ठाणे परिसरात घडली आहे. सविस्तर वाचा...
- औरंगाबाद - निर्जनस्थळी उभी असलेल्या एका कारच्या आत महिला व पुरुषाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली. बुधवारी दी. 16 रोजी संध्याकाळी चिकलठाणा पोलीस ठाणे हद्दीतील गांधेली शिवारात ही ( Couple body found in a car in Gandheli ) कार आढळली. दोघे प्रेमी युगुल असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - पहिल्या पत्नीशी कायदेशीररित्या घटस्फोट होत नाही. तोपर्यंत दुसरी पत्नी मृत पतीच्या पेशन्ससाठी पात्र नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. सोलापूर येथील याचिकाकर्त्या महिलेची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून ( HC Result on husbands pension ) लावली. यावेळी त्यांनी हा निर्णय ( Mumbai HC Result ) दिला. सविस्तर वाचा...
- मुंबई - राज्य विधानमंडळाचे वर्ष 2022 चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन (MH Budget Session 2022) मुंबई येथे 3 मार्च 2022 पासून आयोजित करण्याबाबत राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting Decision) घेण्यात आला. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सविस्तर वाचा...
- मुंबई - प्रसिद्ध गायक बप्पी लहिरी यांचे निधन झाले. 'बप्पी दा' नावाने ओळखले जाणारे संगीतकार 69 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते विविध आजारांनी ग्रस्त होते. निद्रानाशामुळे त्यांचे निधन ( Singer-composer Bappi Lahiri passes away at 69 ) झाल्याचे डॉक्टर दीपक नामजोशी सांगितले. त्यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. या महिन्यात बॉलिवूड जगताला एकापाठोपाठ एक मोठे धक्का बसले आहेत. बप्पी लहिरी यांच्या आधी स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले होते. बप्पी लहिरी यांच्या निधनावर राजकीय नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. सविस्तर वाचा...
- कोलकाता : आजपासून (16 फेब्रुवारी) भारत आणि वेस्ट इंडिज ( India and West Indies ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथे खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने सुरुवातीला गोलंदाजी ( India opt to bowl ) घेतली. भारताने विंडीजला 158 रणांवरच थाबवले. या धावांचा पाठलाग करताना हा सामना भारताने 6 गडी राखत जिंकला आहे. त्यमुळे भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. सविस्तर वाचा...
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -