ETV Bharat / bharat

आज औरंगाबादेत आक्रोश मोर्चा, कर्जतमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन; टॉप न्यूज वाचा एका क्लिकवर

आज (13 नोव्हेंबर) आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

13 November 2021 news Updates
कर्जतमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन
author img

By

Published : Nov 13, 2021, 5:49 AM IST

आज 'या' बातम्यांवर असेल नजर -

  • औरंगाबादेत आक्रोश मोर्चा -
    केंद्र सरकारचे चुकीचे धोरण व वाढत्या महागाई विरोधात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात औरंगाबाद येथे आक्रोश मोर्चा होणार आहे. सविस्तर वाचा...
  • मंत्री वडेट्टीवार, राऊत, तनपुरे चंद्रपूर दौऱ्यावर -
    राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे चंद्रपूर दौऱ्यावर जाणार आहेत.
  • संजय राऊतांचा मुक्तसंवाद -
    एमजीएम विद्यापीठातील रुक्मिणी सभागृहात खासदार संजय राऊत यांचा मुक्तसंवादाचा कार्यक्रम होणार आहे.
  • कर्जतमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन -
    अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि नगरविकार मंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे.

कालच्या महत्त्वाच्या बातम्या -

  • मुंबई - केंद्र सरकारने कंगना रणौतला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा. कंगना यांना अमली पदार्थाचा डोस जास्त झाल्याने, त्या अशी वक्तव्य करत असल्याचा टोला राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. कंगना यांनी केलेल्या वक्तव्यामुळे स्वातंत्र्यसैनिक तसेच सीमेवर लढणाऱ्या जवानांचा अपमान झाला आहे. गांधीजीपासून सर्वच स्वातंत्र्यसेनानी यांचा हा अपमान करण्यात आला असून, कठोर शब्दात कंगना रणौत यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो असंही प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी म्हटले. सविस्तर वाचा...
  • मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची ईडी कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. देशमुख यांना आज मेडीकल चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी त्यांना न्यायालयात हजह करण्यात आले. त्यानंतर विशेष न्यायालयाने वरील निर्णय दिला आहे. दरम्यान, शंभर कोटी कथित वसुली प्रकरणी नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या देशमुख यांच्या मतदारसंघातील एका व्यक्तीला समन्सही बजावण्यात आला आहे. सविस्तर वाचा...
  • मुंबई - राज्य सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघाले आहे. इंधर दरवाढी संदर्भात कॉंग्रेसची भूमिका काय आहे, मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत (OBC reservation) तसेच उर्जा विभाग आणि समृद्धी महामार्गातील पैशे वाटपाच्या संदर्भात कॉंग्रेसचे म्हणणे काय आहे, या सगळ्या विषयात काँग्रेसची काय भूमिका काय, यासंदर्भात ईटीव्ही भारतने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याशी केलेली खास बातचीत...सविस्तर वाचा...
  • औरंगाबाद - देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. फक्त औरंगाबादेतच नाहीतर संपूर्ण देशात महागाईची परवड बसतेय, त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात निषेध म्हणून विराट मोर्चाचे आयोजन औरंगाबादमध्ये केले आहे अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. तर देशात सर्वच ठिकाणी अशांतता अस्थिरता निर्माण होऊन त्यातून 2024 च्या निवडणुकांमध्ये भाजपाला उतरायचे आहे असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केला आहे. सविस्तर वाचा...
  • मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतावे असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला काही कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद दिला जातोय. जे कर्मचारी कामावर परततील त्यांच्या सुरक्षेची हमी एसटी महामंडळाची असेल. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी आपले जे काही म्हणणे आहे ते उच्च न्यायालयाने (HIGH COURT) तयार करण्यास सांगितलेल्या समितीसमोर ठेवावे. या समितीला उच्च न्यायालयाने 12 आठवड्यांचा वेळ दिला आहे. या समितीचा जो अहवाल असेल, तो राज्य सरकारला देखील मान्य असेल. मात्र एसटी महामंडळ (ST Corporation) खड्ड्यात जाईल असे एसटीच्या कर्मचाऱ्यांनी वागू नये, असे आवाहन परिवहन मंत्री अॅड. अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी केले आहे. सविस्तर वाचा...
  • मुंबई - क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Party Case) केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) दिल्लीतील विशेष पथकाने शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याचा नवी मुंबईतील RAF एनसीबी कार्यालयात जबाब नोंदला जात आहे. गेल्या सात तासांपासून एनसीबी विशेष पथकाकडून (NCB's special squad) जबाब नोंदने सुरू आहे. सायंकाळी 5 वाजता चौकशी सुरू झाली होती. आज 13 नोव्हेंबरला आर्यन खानचा वाढदिवस (Aryan Khan birthday) आहे. त्याच्या 24 व्या वाढदिवसाची सुरुवात ही एनसीबीच्या चौकशीतच झाली आहे. सविस्तर वाचा...

जाणून घ्या आजचे राशीभविष्य -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.