आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेसनास होणार सुरुवात
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरुवात होणार आहे. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना कोरोनाबाबतचे नियम पाळत व चाचणी करून अधिवेशन घेण्यात आले होते. महाविकास आघाडीचा हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे.
अधिवेशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अभिभाषण
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अभिभाषण होणार आहे. त्यानंतर अधिवेशनास सुरुवात होणार आहे.
आजपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू
आज देशात 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लसीकरणाचा हा दुसरा टप्पा असून पहिला टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस, कोरोना फ्रन्ट वॉरियर यांना लस देण्यात आली.
खासगी रुग्णालयातही होणार लसीकरण
आजपासून खासगी रुग्णालयातही कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री आज मांडणार आहेत अर्थसंकल्प
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आज दुपारी 12:30 वाजता अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प मांडणार आहेत. ते तिसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत.
आजपासून उत्तराखंडच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात
आजपासून उत्तराखंडमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरू होणार आहे. 4 मार्चला मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत राज्याचा अर्थसंकल्प मांडतील.
बॉक्सींगपटू मेरी कोमचा आज वाढदिवस
बॉक्सींगपटू मेरी कोम हीचा आज वाढदिवस आहे. मेरी कोमने महिला जागतिक हौशी बॉक्सिंग अजिंक्यपद सहावेळा जिंकले असून २०१२ लंडन ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे . या स्पर्धेमधील फ्लायव प्रकारामध्ये कोमने कांस्यपदक मिळवले. २०१४ इंचॉन आशियाई स्पर्धेमध्ये कोमने सुवर्णपदक मिळवले.