मराठी भाषा गौरव दिन
आज 'मराठी भाषा गौरव दिन' दरवर्षी 27 फेब्रुवारीला महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो.
नागपुरात आज सर्व दुकाने राहणार बंद
कोरोना रुग्ण वाढत असल्याने आज नागपूर शहरातील सर्व दुकाने, अस्थापने आणि शासकीय कार्यालयांसह खासगी कार्यालय बंद राहणार आहेत.
कोल्हापुरात भाजपचा रस्ता रोको
कोल्हापूर येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल दाखल करावा. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी सकाळी 11 वाजता रस्ता रोको करण्यात येणार आहे.
अँटिलिया प्रकरणी संशयितांना अटक होण्याची शक्यता
अँटिलिया प्रकरणी संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या सदनिकेबाहेर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात जीलेटीनच्या कांड्या मिळून आल्या होत्या. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आरोपींच्या शोधासाठी 10 पथके रवाना झाली आहे.
भाजपचा सेनाभवनावर मोर्चा
मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आज भाजपकडून मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता भाजपचा मोर्चा सेना भवनावर धडकणार आहे.
मराठी भाषा दिनी मध्यप्रदेशात विविध कार्यक्रमाचे आयोजन
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मध्यप्रदेशच्या भोपाळ येथील रवींद्र भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी साडेसहा वाजता मराठी सुमधुर गायन संध्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
- औरंगाबादमध्ये भाजपचे आंदोलन
मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात औरंगाबाद येथील जालना रस्त्यावर भाजपचे आंदोलन करण्यात येणार आहे.
- खिलोना मेलाचे शुभारंभ
भारत खिलोना मेला 2021 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. हे शुभारंभ सकाळी 11 वाजता व्हर्च्युअली होणार आहे.
- आज ओडीशा विरुद्ध पूर्व बंगाल फुटबॉल सामना
गोव्यातील बोम्बोलिम येथे सुरू असलेल्या आईएसएल (इंडियन सुपर लीग) फुटबॉल मालिकेतील आज ओडीशा विरुद्ध पूर्व बंगाल, असा सामना रंगणार आहे.