ETV Bharat / bharat

News Today : आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर - गुजरात निवडणूक

आज या घडामोडींवर असणार खास नजर

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Feb 23, 2021, 6:33 AM IST

  • कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील विविध शहरात संचारबंदी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाबाबतचे नियम पाळा नाहीतर पुन्हा टाळेबंदी करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिला आहे. सोमवारी (दि. 22) राज्यात 5 हजार 210 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 लाख 06 हजार 094 वर पोहोचला आहे. तर आज 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 806 वर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 94.96 टक्के तर मृत्यू दर 2.46 टक्के आहे. राज्यात आज 5 हजार 035 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 99 हजार 982 वर पोहोचला आहे.
    संग्रहित छायाचित्र
    संग्रहित छायाचित्र
  • वनमंत्री संजय राठोड हे वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे दर्शनासाठी जाणार आहेत. पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर मंत्री राठोड हे आपले मौन तोडून या प्रकरणावर भाष्य करण्याची शक्यता आहे.
    मंत्री संजय राठोड
    मंत्री संजय राठोड
  • कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपुरातील माघी यात्रेनिमित्त प्रशासनाने पंढरपुरात 24 तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे. आषाढी व कार्तिकी यात्रेप्रमाणे यंदाही वारकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
    पंढरपुरातील मंदिर
    पंढरपुरातील मंदिर
  • गुजरात राज्यातील अहमदाबाद, राजकोट, सूरत, वडोदरा, भावनगर व जामनगर या सहा महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीचा आज निकाल आहे. सहा महापालिकेतील 575 जागांसाठी 2 हजार 276 उमेदवार रिंगणात होते. अहमदाबाद 37.81 टक्के मतदान झाले होते. तर राजकोटमध्ये 45.74 टक्के, वडोदरामध्ये 42.82 टक्के, सूरतमध्ये 42.40 टक्के, भावनगरमध्ये 43.66 टक्के व जामनगरमध्ये 49.64 टक्के मतदान झाले होते.
    संपादित छायाचित्र
    संपादित छायाचित्र
  • सांगली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आज निवडणूक पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पाहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने मतदान होणार आहे. हे मतदान दुपारी 12 ते 3 दरम्यान होणार आहे.
    सांगली महापालिका
    सांगली महापालिका
  • अभिनेता करण सिंह ग्रोवर याचा आज जन्मदिवस आहे. करण हा सुरुवातीच्या काळात मॉडलिंग करत होता. त्यानंतर त्याने टेलिव्हिजनवरील मालिकांकडे आपला मोर्चा वळविला. सुरुवातीला तो एकता कपूरच्या 'कितनी मस्त जिंदगी' या मालिकेत काम केले. पण, 'दिल मिल गए' या मालिकेतून त्याला वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर त्याने विविध मालिका, जाहिराती, चित्रपटात काम केले. 30 एप्रिल, 2016 ला त्याने अभिनेत्री बिपाशा बसूसोबत लग्न केले.
    करण सिंह ग्रोवर
    करणसिंह ग्रोवर
  • आज काँग्रेसची महत्वाची बैठक आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षीय कार्यक्रम करू नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला बाजूला सारून बैठक करण्याची शक्यता आहे.
    काँग्रेस
    काँग्रेस
  • गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांना मिळाला असून आज रवी पुजारीला न्यायालयात हजर केले जाणार आहे. 2016 मध्ये मुंबईतील विलेपार्ले परिसरातील गजाली हॉटेलच्या बाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांना गॅंगस्टर रवी पुजारी याचा ताबा मिळालेला आहे. या प्रकरणात एकूण 7 आरोपी आहेत.
    रवी पुजारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.