ETV Bharat / bharat

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर - todays important news

राज्यात आज होणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

todays important news and event in maharashtra
राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर
author img

By

Published : May 15, 2021, 7:02 AM IST

Updated : May 15, 2021, 8:21 AM IST

  • तौत्के चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला धडकणार
    news today
    चक्रीवादळ

अरबी समुद्राच्या आग्नेय भागात लक्षद्वीप बेटांच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच येत्या 24 तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. तसेच या वादळाचा परिणाम 15 ते 17 मे दरम्यान दक्षिण कोकण व गोव्याच्या किनाऱ्यावरही होण्याची शक्यता असल्याचे कुलाबा वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.

  • कोल्हापुरात आजपासून कडक लॉकडाऊन -
    news today
    लॉकडाऊन

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आठ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 15 मे रोजी रात्री बारा वाजल्यापासून 23 मे रात्री 12 पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊन काळात उद्योग, बँका, खासगी कार्यालय, किराणा आदी गोष्टी पूर्णपणे बंद असणार आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज सायंकाळी याबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. जिल्ह्यात तब्बल 12 हजारांहून अधिक अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असून 3 हजारांच्या आसपास रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे प्रशासनाने हा लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे.

  • गोव्यात आजपासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू -
    news today
    कोविड सेंटर

गोवा राज्यात 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण 15 मे पासून सुरू होणार आहे. राज्यातील 35 आरोग्य केद्रांमध्ये हे लसीकरण सुरू होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ‘कोविन’ या पोर्टलवर नोंदणी केलेल्या 18 ते 44 वर्षे वयोगटाोतील नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. सध्या राज्यामध्ये सुरू असलेले 45 वर्षांवरील नागरिकांसाठीचे लसीकरणही सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

  • लातूरमध्ये आजपासून विकेंड लॉकडाऊनला सूरुवात -
    news today
    लॉकडाऊन

जिल्ह्यात 15 व 16 मे 2021 या कालावधीत विकेंड लॉकडाउन प्रमाणेच कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले होते. त्याप्रमाणे या विकेंड लॉकडाऊनला आज सुरुवात होईल.

  • आरएसएस प्रकरण : भिवंडी न्यायालयात आज होणार राहुल गांधीवर सुनावणी
    news today
    राहुल गांधी

महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत राहुल गांधी यांनी आरएसएसवर केलेल्या आरोपाबाबतच्या प्रकरणात आज भिवंडी न्यायालयात सुनावणी होण्याची शकता आहे.

  • हिमाचलमध्ये आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण
    news today
    लसीकरण

हिमाचल प्रदेशमध्ये आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. सरकारने नियोजीत केलेल्या केंद्रावर जाऊन लसीकरण करण्याचे आवाहन हे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी केले आहे.

  • WhatsApp ची नवी पॉलिसी आजपासून
    news today
    whatsapp

व्हॉट्सअ‍ॅपवरील माहिती फेसबुक व इतर संलग्न कंपन्यांशी वाटून घेतली जाईल. युजर जो कंटेंट अपलोड, सबमिट, स्टोअर, सेंट किंवा रिसिव्ह करतात याचा वापर कंपनी कुठेही करू शकते. अशी नवी पॉलिसी आजपासून लागू होणार आहे.

  • बिहारमध्ये कोरोनाचा कहर; लॉकडाउन वाढण्याची शक्यता
    news today
    लॉकडाउन

बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. त्यामुळे येथे लॉकडाउन हे पुढील एक हप्ता वाढण्याची शकता आहे. IMA नेसुद्धा कोरोनाची चेन तोडण्यासाठी लॉकडाउन वाढण्याचा सल्ला दिला आहे.

Last Updated : May 15, 2021, 8:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.