पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर-
तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर राहणार आहे. गुजरातमध्ये झालेल्या नुकसानग्रस्त भागांची ते हवाई पहाणी करणार आहे. शिवाय त्यानंतर ते अहमदाबादमध्ये आढावा बैठक घेणार आहे.
राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक होणार-
तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील अनेक भागांना मोठा फटका बसला आहे. यासह राज्यातील विविध मुद्यांच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज रायगड, सिंधुदुर्ग दौऱ्यावर-
तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पहाणी करण्यासाठी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज रायगड, सिंधुदुर्ग भागाची पहाणी करत आढावा घेणार आहे.
मुंबईत आजपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात -
तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतील लसीकरण थांबविण्यात आले होते. मात्र आजपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
फादर स्टीन स्वामी यांच्या जामीनावर आज सुनावणी होण्याची शक्यता-
भीमा कोरेगाव अर्बन नक्षल प्रकरणातील आरोपी असलेल्या फादर स्टीन स्वामी यांच्या जामीनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
ओडिशामध्ये आजपासून १ जुनपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ -
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओडिशामध्ये आजपासून १ जुनपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. शिवाय नियम अधिक कडक करण्यात येणार आहे.
सुप्रसिद्ध अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा आज वाढदिवस -
आपल्या खास अभिनयामुळे ओळखल्या जाणाऱ्या अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा आज वाढदिवस. त्यांनी हिंदी, इंग्रजीसह विविध सिनेमांव्दारे आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 'गैग्स ऑफ वासेपूर, मांजी, मंटो, ठाकरे यासारखे विविध चित्रपट गाजविले आहे.