आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार -
आज पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (PM-Kisan) आठवा हप्ता थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार येणार आहे. तसेच सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसोबत संवाद देखील साधतील.
आज देशभरात साजरी होणार अक्षय तृतीया -
आज देशभरात अक्षय तृतीयेचा सण साजरा करण्यात येईल. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करायची परंपरा आहे. तसेच विवाहासाठी सुद्धा हा दिवस शुभ मानला जातो.
आज देशभरात साजरी होणार ईद -
आज देशभरात ईद हा सण साजरा करण्यात येणार आहे. मागच्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट असल्याने हा सण घरी राहूनच अगदी साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन प्रशानसातर्फे करण्यात आले आहे.
पुणे : कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आज अजित पवार यांची बैठक
कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार स्थानिक प्रशासासोबत बैठक घेणार आहे. यावेळी विविध मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
नागपूर : नितीन गडकरींच्या हस्ते कोविड रुग्णालयाचे उद्धाटन -
नागपूरमध्ये स्थापन करण्यात आलेल्या नव्या कोविड रुग्णालयाचे उद्धाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येईल.
मराठा आरक्षण प्रश्नावर सचिन सावंत यांची पत्रकार परिषद -
मराठा आरक्षण प्रश्नावर कॉंग्रेस नेते सचिन सावंत आज दुपारी ४ वाजता पुणे येथील काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करतील.
आज संभाजी महाराज जयंती -
आज छत्रपती श्री संभाजी महाराज यांची ३६४ वी जयंती देशभरात साजरी करण्यात येईल. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने मिरवणूक न काढता साधेपणाने ही जयंती साजरी करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.