मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता -
अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश्य धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. 16 मे च्या सकाळपर्यंत हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कुलाबा वैधशाळेच्या वैज्ञानिक शुभांगी भुत्ते यांनी सांगितले. या चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्ट्यांना बसणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद -
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आज कोरोना तसेच राज्यातील विविध प्रश्नांवर सकाळी 10 वाजताच्या सुमारास पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
आज सर्वोच्च न्यायालयाचे 37 वे न्यायाधिश के.जी. बालक्रिशनन यांचा वाढदिवस
आज सर्वोच्च न्यायालयाचे 37 वे न्यायाधिश के.जी. बालक्रिशनन यांचा वाढदिवस आहे. त्यांनी 3 वर्षापेक्षा जास्त काळ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधिश म्हणून काम बघितले.
दिल्ली उच्च न्यायालयात आज सेंट्रल विस्टा प्रकल्पावर सुनावणी
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. यादरम्यान सेंट्रल विस्टा प्रकल्पाला स्थगिती द्यावी याबाबत दाखल याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
हरियाणाच्या सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आजपासून गव्हाची सरकारी खरेदी
हरियाणा राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज गव्हाची सरकारी खरेदी करण्यात येणार आहे.
ऑक्सिजन आणि औषध पुरवठ्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
आज सर्वोच्च न्यायालयात कोरोनाच्या ऑक्सिजन आणि औषध पुरवठ्याबाबत दाखल याचिकांवर सुनावणी होणार आहे.
आज सलमान खानचा राधे चित्रपट होणार लॉंच
अभिनेता सलमान खान याचा बहुचर्चित राधे हा चित्रपट आज ऑनलाईन लॉंच होणार आहे.