मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४६६५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५०८९० रूपये आहे. चांदीच्या दरात कुठलेही बदल झालेले नसून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ५८६ रूपये आहे. (Gold, Silver price Updates). सोने आणि चांदीच्या दरामध्ये आज जोरदार घसरण पाहावयास मिळत आहे. सोने १०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. दुसरीकडे कोलकात्यात चांदीच्या दारात मोठी घसरण झाली असून, येथे चांदी ५ हजार ६०० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ५१०३० रुपये
- दिल्ली - ५१०३० रुपये
- हैदराबाद - ५०८९० रुपये
- कोलकत्ता - ५०८९०रुपये
- लखनऊ - ५१०४० रुपये
- मुंबई - ५०८९० रुपये
- नागपूर - ५०९०० रुपये
- पुणे - ५०९०० रुपये
देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ६५१०० रुपये
- दिल्ली - ५८६०० रुपये
- हैदराबाद - ६५१०० रुपये
- कोलकत्ता - ५८६०० रुपये
- लखनऊ - ५८६०० रुपये
- मुंबई - ५८६०० रुपये
- नागपूर - ५८६०० रुपये
- पुणे - ५८६०० रुपये
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी- सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.