आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस
10 मार्च (आज) रोजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे. त्यानंतर राज्यात कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.
![विधान भवन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10942772_adhiveshan.jpg)
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेच्या मागणीसाठी विधानभवनाच्या आवारात विरोधक विरोध दर्शवण्याची शक्यता आहे
![पोलीस अधिकारी सचिन वाझे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10942772_sachin.jpg)
कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर गृहमंत्र्यांचे उत्तर अद्याप आले नाही, आज उत्तर अपेक्षित आहे.
![गृहमंत्री अनिल देशमुख](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10942772_deshmukh.jpg)
आज शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटची बैठक होणार आहे.
![शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10942772_shiwaji.jpg)
नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी आज संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित करणार आहेत.
![पंतप्रधान मोदी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10942772_modi.jpg)
ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे पोहोचल्या आहेत, आज उमेदवारी अर्ज दाखल करतील
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी नंदीग्राम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारीपूर्वी आपल्या मतदारसंघात पोहोचलेल्या ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
![मुख्यमंत्री ममता बॅनर्जी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10942772_mamata.jpg)
देहरादून: आज भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक, सर्व लोकसभा, उत्तराखंडचे राज्यसभा सदस्यही उपस्थित असतील.
![भाजप](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10942772_bjp.jpg)
पूर्व यूपीती शेतकरी आंदोलनाचे पडसाद, राकेश टिकैत आज बलियामध्ये किसान सभा घेणार आहेत.
राष्ट्रीय किसान संयुक्त मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश टिकैत यांच्या पूर्वांचलमध्ये बुधवारी पहिली किसान महापंचायत होणार आहे. बलियामधील सिकंदरपूर येथील चेतन किशोर मैदानावर शेतकरी-कामगार महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय सचिव पुरुषोत्तम शर्मा यांच्याशिवाय इतरही अनेक नेते त्यांच्यासमवेत असतील.
![राष्ट्रीय किसान संयुक्त मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश टिकैत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10942772_rakesh.jpg)
हरयाणातील भाजप सरकारची आज अग्नीपरीक्षा, बहुमत सिद्ध करावं लागणार
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडत असताना उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदावरून त्रिवेंद्रसिंह रावत यांची उचलबांगडी केली गेली. उत्तरेतील भाजपच्या एका सरकारमध्ये अस्वस्थता असताना आता हरयाणातील भाजपच्या मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर सरकारची अग्नीपरीक्षा आहे. काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास प्रस्तावामुळे सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
![मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10942772_hariyana.jpg)
संपूर्ण पश्चिम हिमालयीन भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि बर्फ पडण्याची शक्यता
संपूर्ण पश्चिम हिमालयीन भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि बर्फ पडण्याची शक्यता आहे. 10 ते 12 मार्च दरम्यान पश्चिम हिमालयात विजांच्या कडकडाटात पाऊस होऊ शकतो.
![संग्रहीत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10942772_rain.jpg)
प्रसिद्ध मराठी कवी मंगेश पाडगावकर यांची आज जयंती
पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषा विषय शिकवत होते. पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत.
![प्रसिद्ध मराठी कवी मंगेश पाडगावकर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10942772_padagaonkar.jpg)