मुंबई- तौक्ते चक्रीवादळात झालेल्या अफकॉन्स बार्ज दुर्घटनेप्रकरणी ओएनजीसीच्या 3 एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर यांना निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भात चौकशी पूर्ण होईपर्यंत हे तिघे निलंबित राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्रालयाबकडून स्थापन करण्यात आलेल्या कमिटीने दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतलेला आहे. ज्या तीन संचालकांना निलंबित करण्यात आलेले आहे ते ओएनजीसीच्या ड्रिलिंग, सुरक्षा वेब शोध या गोष्टींसाठी जबाबदार आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीनुसार तौक्ते चक्रीवादळाकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणा केल्याचं दिसून आलं आहे.
Big Breaking News: मुंबईतील बार्ज दुर्घटनेप्रकरणी तीन अधिकारी निलंबीत - बदलापूर गॅस लीक
11:46 June 04
मुंबईतील बार्ज दुर्घटनेप्रकरणी तीन अधिकारी निलंबीत
10:14 June 04
उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीवर्धनमध्ये दाखल, समुद्रकिनारा सुशोभीकरण कामाचे केले भूमिपूजन
रायगड - उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीवर्धनमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी श्रीवर्धन समुद्रकिनारा सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन केले. तसेच समुद्र किनाऱ्याची पाहणी करून अधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
10:07 June 04
अनलॉकबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील - विजय वडेट्टीवारांचे स्पष्टीकरण
अनलॉकबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार असल्याचं, गुरुवारी विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली होती. मात्र, अजून हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आल्यानं गोंधळ उडाला होता. यावेळी श्रेयवादासाठी मी कालंचे वक्तव्य केले नसल्याचंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.
09:37 June 04
ओशिवरातील आशियाना इमारतीला आग
मुंबई - ओशीवरा भागातील आशीयाना टॉवर इमारतीला सकाळी आग लागली. ही आग लेव्हल २ ची असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
06:08 June 04
बदलापूर एमआयडीसीमध्ये गॅस गळती, परिस्थिती नियंत्रणात
ठाणे - बदलापूर एमआयडीसीमध्ये नोबेल इंटरमिडीएट्स प्रा. ली. या कंपनीत ओव्हर हीट (जास्त तापमानामुळे) केमिकल रिअॅक्शन होऊन गॅस गळती झाली. त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळे जळजळण्याचा आणि घशात त्रास सुरू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांकडून गॅस गळती थांबवण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.