ETV Bharat / bharat

World Post Day 2022 : आज जागतिक पोस्ट दिवस, डाकिया डाक लाया... ख़ुशी का पयाम...

आज ९ ऑक्टोबर जागतिक पोस्ट (Today is World Post Day) दिवस. पूर्वीच्या तुलनेत पत्राचे युग कमी झाले असेल, परंतु आजही संवादाचे हे माध्यम सर्वोत्तम मानले जाते. आजही शेकडो संस्था आणि कार्यालये अधिकृत कामासाठी टपाल सेवेवर अवलंबून आहेत. जागतिक पोस्ट दिन साजरा का आणि कसा सुरू झाला ते जाणून घेऊया. history and importance of Indian Postal Service.

author img

By

Published : Oct 9, 2022, 1:33 PM IST

World Post Day 2022
जागतिक पोस्ट दिवस

World Post Day 2022 : ९ ऑक्टोबर १८७४ रोजी स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथे जगातील २२ देशांचा समावेश करून युनिव्हर्सल पोस्टल युनियन (यूपीयू) ची स्थापना करण्यात आली. युनिव्हर्सल पोस्टल युनियन ही पोस्ट आणि पोस्टल सेवा विभागासाठी काम करणारी पहिली आंतरराष्ट्रीय संस्था होती. पुढे 1969 मध्ये जपानची राजधानी टोकियो येथे UPU ची परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत UPU चा स्थापना दिवस म्हणजेच ९ ऑक्टोबर हा जागतिक पोस्ट दिवस (Today is World Post Day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय (history and importance of Indian Postal Service) घेण्यात आला.

जगातील पहिले एअर मेल भारतात सुरू झाले : 18 फेब्रुवारी 1911 रोजी, फ्रेंच पायलट हेन्री पॅकेट यांनी विमानाने उड्डाण केलेले पहिले अधिकृत मेल केले. हे उड्डाण भारतातून झाले होते. पॅकेट यांनी त्याच्या हंबर बायप्लेनवर सुमारे 6,000 कार्डे किंवा पत्रे एका सॅकमध्ये ठेवली होती. आणि तेथुन भारतात सुरु झाला माणसांप्रमाणे पत्रांचा प्रवास.

जागतिक पोस्ट दिवस : स्मार्ट फोन आणि इंटरनेटच्या युगात लोक पोस्टल सेवा जवळजवळ विसरले आहेत. परंतु आजही ज्या ठिकाणी तुमचा स्मार्ट फोन किंवा इंटरनेट पोहोचू शकत नाही, तिथे पोस्ट पोहोचते. या पदाचे महत्त्व एका उदाहरणाने समजू शकतो. एक व्यकती जो लडाखमध्ये एका अश्या ठिकाणी काम करत होता, जिथे नेटवर्क नेहमीच उपलब्ध नसते आणि ऑनलाइनची सुविधा नसते. सणाला रजा न मिळाल्याने त्यांना घरी परतता येत नाही. मात्र, कुटूंबातील व्यक्तिंनी पाठविलेल्या पत्रांमुळे त्यांना आनंद होतो. पोस्टाची ही उपयुक्तता आणि महत्त्व लोकांना जागृत करण्यासाठी दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जागतिक पोस्ट दिवस साजरा केला जातो.

डाकिया डाक लाया : डाकिया डाक लाया (Dakiya DaK Laya) हे 'पलकों की छाओंमे' या हिंदी सिनेमातील गाणे देखील अत्यंत लोकप्रिय झाले होते. त्याकाळी घरी कुणाचेही पत्र घेऊन पोस्टमन आला की, घेणाऱ्याच्या तोंडात हमखास ते गाणे आठवायचे. या गाण्याने डाक सेवा आणि सेवा देणारा पोस्टमन जगप्रसिध्द आणि लोकप्रिय झालेत, असे म्हणायला हरकत नाही.

जागतिक पोस्ट दिवस 2022 मनोरंजक तथ्ये : जागतिक पोस्ट दिवस दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांना जागरुक करणे आणि टपाल विभागाची भूमिका साजरी करणे हा आहे. टपाल विभाग दररोज लोकांसाठी आणि व्यवसायासाठी उपयुक्त आहे. जागतिक सामाजिक आणि आर्थिक विकासात पोस्टाच्या योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो. पोस्ट हे जगातील सर्वात मोठे लॉजिस्टिक नेटवर्क आहे. दरवर्षी 150 हून अधिक देश वेगवेगळ्या प्रकारे जागतिक पोस्ट दिन साजरा करतात. काही देशांमध्ये, जागतिक पोस्ट दिवस सुट्टी म्हणून साजरा केला जातो. जागतिक टपाल दिन 2022 ची थीम 'पोस्ट फॉर प्लॅनेट' आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.