ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना होईल आर्थिक फायदा, वैवाहिक जीवनात राहील गोडी; वाचा राशीभविष्य - वाचा राशीभविष्य

Today Horoscope : कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 24 डिसेंबर 2023 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसं असेल ते जाणून घेऊ.

Today Horoscope
राशी भविष्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2023, 7:07 AM IST

मेष : आज आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह स्वादिष्ट भोजन घेऊन आनंदात वेळ घालवू शकाल. आर्थिक बाबतीत भविष्यासाठी उत्तम नियोजन करू शकाल. आज प्राप्तीत वाढ होईल. कलावंत, कारागिर यांना आपलं कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल आणि त्यात त्यांची कदर सुद्धा केली जाईल. नकारात्मक विचारापासून दूर राहावं लागेल.

वृषभ : आजचा दिवस उत्साह आणि प्रसन्नतेचा आहे. प्रकृती उत्तम असल्यानं सुख आणि आनंद अनुभवाल. सगे - सोयरे किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. प्रवास आणि स्वादिष्ट भोजन यामुळे आजचा दिवस आणखीच आनंदी होईल. आर्थिक फायदा संभवतो. आज वैवाहिक जीवनातील सौख्य प्राप्त होईल.

मिथुन : आज आपलं संयमशील आणि विचारपूर्ण वर्तन अनेक अनिष्ट गोष्टींपासून आपला बचाव करू शकेल. आपल्या वक्तव्यानं गैरसमज निर्माण होतील. शारीरिक कष्ट मनाला अस्वस्थ बनवतील. कौटुंबिक वातावरण गढूळ राहील. डोळ्यांना पीडा होईल. खर्च जास्त होईल. मानसिक शांतीसाठी आपणास प्रयत्न करावे लागतील.

कर्क : आज अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे झाल्यानं आपण आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापार्‍यांशी फायद्याचे सौदे होतील. संतती आणि पत्नी यांच्याकडून लाभ होईल. प्रवास, पर्यटन संभवतात. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. आज उत्तम भोजन आणि स्त्रीसुख मिळेल.

सिंह : आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टिनं उत्तम आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. आज सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. पैतृक लाभ संभवतो. सरकारी कामात फायदा होईल. प्रकृती चांगली राहील. वैवाहिक जीवनात गोडी राहील. घर, जमीन आणि मालमत्तेचे व्यवहार यशस्वी होतील.

कन्या : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. परदेशस्थ आप्तेष्टांकडून आनंददायी बातमी मिळेल. भावंडांकडून काही लाभ संभवतो. विविध मार्गानं आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

तूळ : आजचा दिवस शुभ फलदायी असल्यानं नवे कार्य हाती घेऊन त्यात यशस्वी होऊ शकाल. वक्तृत्व आणि कृती संयमित ठेवणं हितावह राहील. द्वेषापासून दूर राहा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. रहस्यमय आणि गूढविद्येकडं आकर्षित व्हाल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. भिन्नलिंगी व्यक्ती आणि पाण्यापासून दूर राहणं हितावह राहील. मनाला शांती मिळण्यासाठी प्रयत्नशील राहा.

वृश्चिक : आजचा दिवस काहीसा वेगळाच आहे. स्वतःसाठी वेळ काढू शकाल. मित्रांसह प्रवास, मौज - मजा, मनोरंजन आणि एखाद्या सहलीस जाऊन तसेच रुचकर भोजन, वस्त्रालंकार इत्यादींमुळे आज आपण खूप आनंदी राहाल. मान - सन्मानात वाढ होऊन एखादा सत्कार होण्याची शक्यता सुद्धा आहे. वाहनसौख्य मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्यानं आपलं मन प्रफुल्लित होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

धनू : आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. घरात शांतता आणि आनंदाचं वातावरण राहील. नोकरीत लाभ आणि सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कार्यात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. मातुल घराण्याकडून एखादी चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. वाणीवर संयम ठेवावा लागेल. मित्र - मैत्रिणींचा सहवास घडेल.

मकर : आज आपण मनानं खूप अशांत राहाल. आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही. त्यामुळं तणावात राहाल. शक्यतो आज कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आज आपणास नशिबाची साथ न मिळाल्यानं आपणास नैराश्य येईल. संतती विषयी चिंतीत व्हाल. कुटुंबातील थोरांची प्रकृती बिघडू शकते. शारीरिक दृष्टया अस्वस्थ राहाल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद - विवाद टाळावेत. पोटाचं दुखणं बळावण्याची शक्यता आहे.

कुंभ : आज आपण अती संवेदनशील झाल्यानं आपलं मन बेचैन आणि अस्वस्थ होईल. जीद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. स्थावर - संपत्ती किंवा वाहन यांचे कागदपत्र बनवताना सावध राहावे. महिलांचा सौंदर्य प्रसाधनं, वस्त्र, आभूषणं यांच्या खरेदीसाठी खर्च होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल.

मीन : आजचा दिवस महत्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल आहे. विचारात दृढता राहील. कामं पूर्ण होतील. सृजनात्मक आणि कलात्मक शक्ती वाढेल. मित्र आणि कुटुंबियांसह एखाद्या प्रवासाला जाल. भावंडांकडून फायदा होईल. कामाचं यश आपलं मन आनंदी करेल. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान होतील. आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकाल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.