मेष : 23 ऑक्टोबर 2023 सोमवार चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्दया संबंधी वरिष्ठांशी विचार - विनिमय होतील. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कार्यभार वाढेल. कौटुंबिक गोष्टीत मनापासून रस घेऊन कुटुंबियाबशी सल्ला - मसलात कराल. गृहसजावटीचे आयोजन कराल. आईशी जास्त जवळीक निर्माण होईल.
वृषभ : 23 ऑक्टोबर 2023 सोमवार चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. व्यापार्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्या बातम्या आपणाला भाव विवश बनवतील. दूरच्या प्रवासाची शक्यता आहे. कामाचा व्याप थकवा व उबग आणेल.
मिथुन : 23 ऑक्टोबर 2023 सोमवार चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज अनियंत्रित रागाला लगाम घालावा लागेल. बदनामी व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय व कार्यालयातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवादाचे प्रसंग येतील. त्यामुळे मन सुन्न राहील. आजारी व्यक्तीची नव्याने तपासणी किंवा शस्त्रक्रिया शक्यतो आज करू नका. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा.
कर्क : 23 ऑक्टोबर 2023 सोमवार चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौज - मजेची साधने, उत्तम दागीने व वाहन खरेदी होईल. मौज - मस्ती व मनोरंजनात वेळ खर्च होईल. तसेच भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास आपणास सुखद अनुभव देईल. दांपत्य जीवनात उत्कट प्रेमाचा अनुभव येईल. भागीदारीत फायदा होईल. सहलीची शक्यता आहे.
सिंह : 23 ऑक्टोबर 2023 सोमवार चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील. दैनंदिन कामात जरा अडचणी येतील. खूप परिश्रम कराल. वरिष्ठांशी वाद - विवाद टाळा.
कन्या : 23 ऑक्टोबर 2023 सोमवार चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस चिंता व उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. अचानक धनखर्च होईल. बौद्धिक चर्चेत असफल व्हाल. प्रियव्यक्तीचा सहवास लाभेल. भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित व्हाल. शेअर, सट्टा ह्यापासून दूर राहणे उचित ठरेल.
तूळ : 23 ऑक्टोबर 2023 सोमवार चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपण खूप भावनाशील व्हाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या प्रकृतीची काळजी राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. कौटुंबिक व जमीन - जुमल्या संबंधी चर्चा करताना दक्ष राहा. पाण्या पासून जपून राहा.
वृश्चिक : 23 ऑक्टोबर 2023 सोमवार चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस कार्यात यश व आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण व प्रेमाचे संबंध राहतील. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने मनाला आनंद वाटेल. जवळपासचा प्रवास होईल. आरोग्य उत्तम राहील.
धनू : 23 ऑक्टोबर 2023 सोमवार चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज द्विधा मनःस्थिती व घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. महत्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही. कुटुंबियांचे गैरसमज होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावे लागतील. दूरस्थ मित्र वा नातलग यांना तोंड द्यावे लागेल. त्यांच्याकडून येणार्या बातम्या किंवा निरोप आपणांस लाभदायक ठरतील.
मकर : 23 ऑक्टोबर 2023 सोमवार चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरवात मंगल वातावरणाने होईल. एखादा मांगलिक प्रसंग घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. मित्र व आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळतील. शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्न राहाल. नोकरी - व्यवसायात पण अनुकूल वातावरण राहील. दांपत्य जीवनात परमानंद लाभेल. घसरणे - पडणे, जखम होणे यांपासून सावध राहा.
कुंभ : 23 ऑक्टोबर 2023 सोमवार चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज शक्यतो आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. स्वकीयांशी मतभेद होतील. इतर कोणाचे हित करण्याच्या प्रयत्नात स्वतः अडचणीत येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. मानहानी होण्याची शक्यता आहे.
मीन : 23 ऑक्टोबर 2023 सोमवार चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपणास सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. मित्र - स्नेह्यांशी सुसंवाद साधल्याने मनाला आनंद होईल. सुंदर स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत ठरवाल. एखादी आनंददायी बातमी समजेल. पत्नी व संतती कडून लाभ होईल. अचानक धनप्राप्ती संभवत आहे. नवीन व महागडी वस्तू खरेदी करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
हेही वाचा :