ETV Bharat / bharat

'या' राशींच्या व्यक्तींना दिवस आहे शुभ फलदायी, योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

Today Horoscope : कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 23 डिसेंबर 2023 च्या दैनिक कुंडलीत राशीभविष्य कसं असेल ते जाणून घेऊ.

Today Horoscope
आजचं राशीभविष्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 23, 2023, 7:26 AM IST

मेष : आजचा दिवस आनंदोत्सव साजरा करण्याचा आहे. आजचा दिवस शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल. घरातील वातावरण आनंदाचं असेल. स्त्रीयांना माहेरहून काही लाभ होऊन एखादी चांगली बातमी मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. मित्र आणि स्नेह्यांसह आनंददायी प्रवास कराल. त्यांच्याकडून भेटवस्तू प्राप्त झाल्यानं आपणास आनंद होईल.

वृषभ : आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपणास विविध चिंता सतावतील. प्रकृतीची साथ मिळणार नाही. स्नेही आणि नातलग यांच्याशी मतभेद झाल्यानं घरात विरोधी वातावरण निर्माण होईल. कामं अपूर्ण राहतील. काही कारणास्तव खर्च वाढेल. केलेल्या कष्टाचं फळ असमाधानकारक असेल. त्यामुळं नैराश्य येईल. घाईघाईनं घेतलेल्या निर्णयामुळं गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल.

मिथुन : आजचा दिवस व्यापारी वर्गासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारात आणि उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळं आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे. पत्नी आणि संततीकडून एखादी चांगली बातमी मिळेल.

कर्क : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापारी वर्गास लाभ होईल. नोकरीत बढती संभवते. कुटुंबात एकोपा राहील. नवीन सजावट करून घराची शोभा वृद्धिंगत कराल. आई कडून लाभ होईल. शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. धन आणि प्रसिद्धी वाढेल.

सिंह : आजचा दिवस आळस आणि थकवा यात जाईल. आपल्या तापट स्वभावामुळं मानसिक तणाव राहील. पोट दुखीनं हैराण व्हाल. यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. नकारात्मक विचार, वर्तन आणि नियोजनापासून दूर राहावं लागेल. एखादा प्रवास संभवतो. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल.

कन्या : आज आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. अती उत्साह आणि क्रोधाचं प्रमाण वाढल्यानं आरोग्यावर ताण येण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. अवैध कामांपासून दूर राहावं लागेल. एखादा प्रवास संभवतो. सरकार विरोधी कृतीमुळे समस्या निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. खर्चाचं प्रमाण वाढेल.

तूळ : आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्‍या अर्थानं लुटाल. सामाजिक हेतूनं कुटुंबीयांसह बाहेर जावं लागेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापारी वर्गाला व्यापारात वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात सफलता आणि कीर्तीलाभ होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ संभवतो.

वृश्चिक : आज अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या भेटी रद्द झाल्यानं निराश आणि क्रोधीत व्हाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचं दिसेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. एखादी अप्रिय बातमी मिळाल्यानं मन व्यथित होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. प्राप्ती कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती राहील. शक्यतो आज नवीन कामाची सुरूवात करू नका.

धनू : आज कार्यपूर्ती न झाल्यानं नैराश्य येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. संततीविषयक बाबींमुळे चिंता वाढतील. शक्यतो आज प्रवास टाळावेत.

मकर : आज आपली मनःस्थिती आणि आरोग्य चांगलं राहणार नाही. कौटुंबिक कटकटीमुळं मन दुःखी होईल. उत्साह आणि आनंद यांचा अभाव राहील. स्वजनांशी मतभेद होतील. छाती संबंधी आजार होऊ शकतो. झोप येणार नाही. मानहानी होऊ शकते. एखादा अपघात संभवतो. मानसिक उद्वेग आणि एकंदरीत प्रतिकूलता यामुळं दिवस चिंतातुर अवस्थेत जाईल.

कुंभ : आज आपणास मनानं हलकं वाटेल. चिंता नाहीशी होऊन उत्साह वाढेल. घरात भावंडांसह काही आयोजन कराल. त्यांच्यासह वेळ आनंदात जाईल. मित्रांच्या आणि आप्तांच्या भेटी होतील. जवळच्या ठिकाणी सहलीसाठी जाऊ शकाल. विरोधकांवर मात करू शकाल. नशिबाची साथ लाभेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.

मीन : आज आपणास खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. रागावर आणि वाणीवर सुद्धा ताबा ठेवावा लागेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार सावधपणे करावे लागतील. शारीरिक आणि मानसिक आरोग्य मध्यम राहील. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मनात नकारात्मक विचार येतील. खाण्यापिण्यावर संयम ठेवावा लागेल.

हेही वाचा :

  1. हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खा आवळ्यापासून बनवलेले 'हे' स्वादिष्ट पदार्थ
  2. हिवाळ्यात मायग्रेन का सुरू होतो? जाणून घ्या त्याची कारणे
  3. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.